Post Office Scheme : भारतीय पोस्ट ऑफिसकडून अनेक प्रकारच्या बचत योजना चालवल्या जातात. पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करून करोडो लोकांना चांगला परतावा मिळत आहे. म्हणूनच लोक पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास महत्व देतात. तसेच पोस्ट ऑफिस स्कीम लोकप्रिय असण्याचे कारण म्हणजे येथील गुंतवणूक जोखीममुक्त आहे.
दरम्यान तुम्हीही सुरक्षित आणि उत्तम परताव्याची योजना शोधत असाल तर अशीच एक पोस्ट ऑफिस योजना म्हणजे ग्राम सुरक्षा योजना. या योजनेसाठी, तुम्ही दररोज केवळ 50 रुपयांची बचत करून 35 लाख रुपयांचा परतावा मिळवू शकता. चला या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
कोण गुंतवणूक करू शकतो?
ग्राम सुरक्षा योजना ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना कार्यक्रमाचा एक भाग आहे. ही विमा पॉलिसी 1995 मध्ये देशातील ग्रामीण लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. 19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील लोक ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकतात.
या योजनेत 10 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. प्रीमियम भरण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता.
कमाई अशी होईल?
जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत दर महिन्याला 1,515 रुपये म्हणजेच दररोज फक्त 50 रुपये गुंतवले तर त्याला 35 लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षी ग्राम सुरक्षा योजना विकत घेतल्यास, तुम्हाला 55 वर्षांसाठी 1,515 रुपये प्रीमियम भरावा लागेल. अशा प्रकारे तुम्हाला 35 लाख मिळतील.
जर तुम्ही वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत ही योजना घेतली तर तुम्हाला दरमहा 1463 रुपये आणि 60 वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला 1411 रुपये भरावे लागतील. तुम्ही प्रीमियम भरणे चुकल्यास, तुम्ही ते 30 दिवसांच्या आत जमा करू शकता. या योजनेच्या परताव्यावर नजर टाकल्यास, गुंतवणूकदाराला 55 वर्षांच्या गुंतवणुकीवर 31.60 लाख रुपये, 58 वर्षांच्या गुंतवणुकीवर 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांच्या गुंतवणुकीवर 34.60 लाख रुपयांचा मॅच्युरिटी लाभ मिळेल.
विशेष म्हणजे, ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत वयाची 80 वर्षे पूर्ण झाल्यावर ही रक्कम दिली जाते. जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर ही रक्कम त्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसाकडे जाते. ग्राम सुरक्षा योजना खरेदी केल्यानंतर 3 वर्षानंतर, ग्राहक ती समर्पण करू शकतो. तथापि, अशा परिस्थितीत कोणतेही फायदे मिळत नाहीत.