Post office scheme : पोस्टाच्या ‘या’ योजनेत काही महिन्यातच पैसे होतील दुप्पट, बघा…

Published on -

Post office scheme : महागाईच्या या जगात गुंतवणूक कारण फार महत्वाचे आहे. कोरोना काळानंतर बऱ्याच जणांना गुंतवणुकीचे महत्व समजले आहे. म्हणूनच आपण आपला पगारातील काही भाग बचत म्हणून बाजूला ठेवला पाहिजे. अशातच ती बचत योग्य ठिकणी गुंतवली पाहिजे. ज्यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळेल.

प्रत्येकाला आपली कमाई अशा ठिकाणी गुंतवायची असते जिथून त्यांना चांगला परतावा मिळू शकेल. आणि ती योजना सुरक्षित देखील असेल. जर तुम्ही गुंतवणुकीसाठी अशी योजना शोधत असाल, तर तुम्ही पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करू शकता. आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या अशा एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत. जिथे गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत, तिचे नाव पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना आहे.

पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करून, तुम्ही कोणत्याही जोखमीशिवाय ठराविक वेळेत निश्चित दराने परतावा मिळवू शकता. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना ७.५ टक्के दराने व्याज मिळते. पैसे दुप्पट करण्याची ही योजना आहे. एवढेच नाही तर या योजनेत गुंतवणुकीवर करात सूटही मिळते. ही योजना आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ प्रदान करते.

पोस्ट ऑफिसच्या या टाइम डिपॉझिट स्कीममध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येते. ज्यामध्ये एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते.

व्याज किती दराने दिले जाते?

पोस्ट ऑफिसच्या या बचत योजनेतील गुंतवणुकीवर एक वर्षाच्या कालावधीसाठी ६.९ टक्के, दोन किंवा तीन वर्षांच्या कालावधीसाठी ७ टक्के आणि पाच वर्षांच्या गुंतवणुकीवर ७.५ टक्के दराने व्याज दिले जात आहे. जर तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील तर तुम्हाला किमान 114 महिने योजना सुरू ठेवावी लागेल. त्यानंतर तुमचे पैसे दुप्पट होतील.

पैसे दुप्पट कसे होणार?

जर एखाद्या ग्राहकाने पाच वर्षांसाठी पाच लाख रुपये गुंतवले. त्यामुळे त्याला वार्षिक ७.५ टक्के दराने व्याज दिले जाते. पाच वर्षांत व्याजाची रक्कम 2,24,974 रुपये होईल. त्यानंतर मॅच्युरिटी रक्कम 7,24,974 रुपये होईल. जर तुम्ही हे पैसे 9.6 वर्षे सतत गुंतवले तर तुमचे पैसे दुप्पट होतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News