Post Office Scheme:- गुंतवणुकीच्या दृष्टीने बघितले तर बँक आणि पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या महत्वपूर्ण असून अनेक गुंतवणूकदार पैसे गुंतवताना बँक आणि पोस्ट ऑफिसला जास्त पसंती देतात.
त्यामागील प्रमुख कारण म्हणजे बँक आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवलेले पैसे हे सुरक्षित राहतात व परताव्याची देखील हमी मिळत असते. ज्याप्रमाणे बँकांच्या मुदत ठेव योजनांना ग्राहकांकडून पसंती दिली जाते.
त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिसच्या देखील अशा अनेक योजना आहेत की त्या गुंतवणुकीसाठी फायद्याच्या असून त्यामध्ये पैसे गुंतवल्याने काही वर्षानंतर तुमची रक्कम ताबडतोब दुप्पट होऊ शकते.
तसेच पोस्टाच्या योजना फायदेशीर आहेतच परंतु सुरक्षित देखील आहे. त्यामुळे आपण पोस्टाच्या काही महत्त्वाच्या योजनांची थोडक्यात माहिती बघू.
पोस्टाच्या या योजनांमध्ये गुंतवलेले पैसे होतील दुप्पट
1- पोस्ट ऑफिस जेष्ठ नागरिक बचत योजना– पोस्टाची ही योजना अतिशय महत्त्वाची असून ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पोस्ट ऑफिस जेष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक 8.2% व्याज देते. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांचे पैसे दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना खूप महत्त्वाची आहे.
2- पोस्ट ऑफिस नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम– पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट ही योजना गुंतवूकीसाठी खूप महत्त्वाची असून या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 7.7% वार्षिक व्याज मिळते. अशा परिस्थितीत ही योजना पैसे दुप्पट करण्यासाठी चांगली मानली जाते.
3- पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र अर्थात केव्हीपी योजना– पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना देखील गुंतवणुकीसाठी खूप फायद्याची योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर 7.5 टक्के दराने वार्षिक व्याज मिळते. ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची असून पोस्ट ऑफिसमध्ये पैसे दुप्पट करण्यासाठी या योजनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
4- पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम– ही योजना देखील खूप फायद्याची असून यामध्ये तुम्ही एकरकमी गुंतवणूक केली तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला व्याज मिळत राहते. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 7.4 टक्के दराने व्याज मिळते.
5- पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना– पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना ही खूप महत्त्वाची योजना असून यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला 7.1% वार्षिक व्याज उपलब्ध असून ही योजना देखील पैसे दुप्पट करण्यासाठी चांगली मानली जाते.
6- पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना– पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक 6.9% व्याज मिळते व पैसे दुप्पट करण्यासाठी एक उत्तम योजना आहे.
7- पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना– पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना देखील खूप महत्त्वाची असून या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 5.8% वार्षिक व्याज मिळते. या योजनेत थोडा कमी व्याजदर असल्यामुळे पैसे दुप्पट होण्यासाठी जास्तीचा कालावधी लागतो. परंतु तरीदेखील ही योजना गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे.
8- पोस्ट ऑफिस बचत बँक खाते योजना– पोस्ट ऑफिसच्या बचत बँक खाते योजनेमध्ये चार टक्के वार्षिक व्याज मिळते. त्यामुळे तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी खूप वेळ लागतो. परंतु तरीदेखील गुंतवणुकीसाठी ही एक चांगली योजना आहे.
9- पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी योजना– पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना सर्वाधिक व्याज देणारी योजना असून या योजनेत वार्षिक 8.20% व्याजदर मिळतो. खास मुलींसाठी ही योजना असून पैसे दुप्पट करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या सर्व योजनांपेक्षा ही योजना उत्तम मानली जाते.