Post Office Scheme : गेल्या काही महिन्यांमध्ये पोस्टाच्या बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. खरे तर मागील वर्षी रिझर्व बँक ऑफ इंडिया ने रेपो रेटमध्ये 1.25 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला.
रेपो रेट मध्ये कपात झाल्यानंतर देशभरातील सरकारी आणि खाजगी बँकांनी फिक्स डिपॉझिट व्याजदर कमी केले. त्यामुळे एफडी करणाऱ्यांना मोठा फटका बसला आणि अनेक जण आता पोस्टाच्या बचत योजनांकडे वळू लागले आहेत.

दरम्यान तुम्ही पण पोस्टाच्या एखाद्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक खास माहिती घेऊन आलो आहोत.
आज आपण पोस्टाच्या अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत जिथे गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्याला 9250 रुपयांपर्यंत व्याज मिळवता येणार आहे.
गुंतवणूकदारांना मिळणार एक लाख 11 हजार रुपयांचे व्याज
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम राबवत आहे. या अंतर्गत गुंतवणूकदारांना सिंगल आणि जॉईंट अकाउंट ओपन करता येते. सिंगल अकाउंट ओपन केल्यास गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त नऊ लाख रुपये गुंतवता येतात.
जॉइंट अकाउंट ओपन केलं तर 15 लाखांची गुंतवणूक करता येते. दरम्यान जर तुम्ही तुमच्या पत्नी समवेत किंवा आई समवेत अथवा परिवारातील इतर सदस्या समवेत या योजनेत जॉईंट अकाउंट ओपन करून कमाल 15 लाखांची गुंतवणूक केली तर तुम्हाला वार्षिक एक लाख 11 हजार रुपयांचे व्याज मिळणार आहे.
म्हणजेच 15 लाखांची गुंतवणूक करून महिन्याला 9250 रुपयांचे निश्चित व्याज गुंतवणूकदारांना मिळवता येणार आहे मात्र यासाठी एक आठ आहे ते म्हणजे या योजनेत तुम्हाला जॉईंट अकाउंट ओपन करावे लागेल. जॉईंट अकाउंट मध्ये जास्तीत जास्त तीन लोक सामील होऊ शकतात.
या योजनेचा कालावधी हा पाच वर्षांचा असतो. या योजनेतून मिळणारे व्याज हे थेट गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात वर्ग केले जाते. या योजनेतून गुंतवणूकदारांना दर महिन्याला व्याज मिळवता येते. तसेच योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना योजनेत गुंतवलेला पैसा सुद्धा रिटर्न दिला जातो.













