Post Office Scheme : बायकोच्या नावे पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा ! 2 वर्षातच लखपती बनणार, वाचा ए टू झेड माहिती

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही देखील अशीच एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेत महिला गुंतवणूकदार एकदा गुंतवणूक करून दोन वर्षात चांगला पैसा कमवू शकणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या बायकोच्या नावे या योजनेत पैसे गुंतवले तर तुम्हाला यातून चांगला फायदा होणार आहे. दोन वर्षातच या योजनेतून तुम्ही लखपती व्हाल. आता आपण महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

Ahmednagarlive24
Published:
Post Office Scheme

Post Office Scheme : प्रत्येकजण अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा भागवण्यासाठी अहोरात्र काबाडकष्ट करत असतो. या तिन्ही गरजांची पूर्तता करण्यासाठी पैसा लागतो. यामुळे पैसा कमावण्यासाठी आपण सर्वचजण प्रयत्नरत असतो. नोकरी, व्यवसायसह वेगवेगळ्या कामांमधून पैसे कमवले जातात. काहीजण अतिरिक्त कमाईसाठी नोकरी सोबतच त्यांनी साठवलेले पैसे एफडी, बचत योजना यांसारख्या ठिकाणी गुंतवून पैसे कमवतात.

दरम्यान, जर तुम्हीही येत्या काही दिवसांनी बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. विशेषता महिलांसाठी ही बातमी अधिक कामाची राहणार आहे. महिला गुंतवणूकदारांसाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही देखील अशीच एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेत महिला गुंतवणूकदार एकदा गुंतवणूक करून दोन वर्षात चांगला पैसा कमवू शकणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या बायकोच्या नावे या योजनेत पैसे गुंतवले तर तुम्हाला यातून चांगला फायदा होणार आहे. दोन वर्षातच या योजनेतून तुम्ही लखपती व्हाल. आता आपण महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

कशी आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ?
ही पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाणारी एक सरकारी बचत योजना आहे. यामध्ये केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित आहे. ही योजना दोन वर्षांसाठी आहे. यामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतोय. या योजनेत फक्त महिलाच गुंतवणूक करू शकतात.

अर्थातच तुम्ही तुमच्या बायकोच्या नावे, तुमच्या आईच्या नावे, तुमच्या बहिणीच्या नावे या योजनेत गुंतवणूक करू शकता. या सरकारी बचत योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीसाठी सध्या पोस्ट ऑफिस कडून 7.5% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी 2023 मध्ये याची सुरुवात झाली आहे.

या योजनेत माजी मंत्री स्मृती इराणी यांनी देखील गुंतवणूक केली आहे. ही योजना दोन वर्षांसाठी असून यामध्ये जास्तीत जास्त दोन लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. जर समजा एखाद्या महिलेने या योजनेत दोन लाख रुपये गुंतवले तर तिला दोन वर्षांनी 7.5% या इंटरेस्ट रेटने 2 लाख 31 हजार 125 रुपये मिळणार आहेत.

अर्थातच 31,125 रुपये व्याज म्हणून मिळणार आहेत. या योजनेत दहा वर्षाच्या मुली देखील अकाउंट ओपन करू शकतात मात्र हे अकाउंट त्यांच्या पालकांच्या वतीने ओपन केले जाणार आहे. विशेष म्हणजे या योजनेतून मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस आकारला जात नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe