Post Office Scheme: पती-पत्नी मिळून या योजनेमध्ये खाते उघडा व महिन्याला 9 हजार रुपये मिळवा! वाचा संपूर्ण माहिती

Ajay Patil
Published:
post office scheme

Post Office Scheme:- तरुणपणामध्ये किंवा आपण जोपर्यंत नोकरी किंवा व्यवसाय करत असतो त्या कालावधीमध्ये आपण जो काही पैसा कमवतो त्या पैशाची बचत करून चांगल्या गुंतवणूक योजनेमध्ये त्याची गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते.

कारण जेव्हा व्यक्तीची वाटचाल उतारवयाकडे सुरू होते तेव्हा स्वतःला आर्थिक गरजा भागवण्याच्या दृष्टिकोनातून कोणासमोर हात पसरावे लागू नयेत या दृष्टिकोनातून गुंतवणूक करणे देखील फायद्याचे ठरते.

याकरिता अनेक पेन्शन योजना देखील आहेत. एवढेच नाही तर अशा योजनांमध्ये गुंतवणूक करून आयुष्यात येणाऱ्या अनेक आर्थिक गरज आपल्याला पूर्ण देखील करता येतात व चांगला पैसा जमा झाल्यामुळे आयुष्यामध्ये पैशांची चणचण भासत नाही.

यासाठी बँकांच्या योजना आहेत तसेच त्यासोबत पोस्ट ऑफिसच्या देखील महत्त्वाच्या अशा योजना आहेत. यामध्ये पोस्ट ऑफिसची जर आपण मंथली इनकम स्कीम पहिली तर ही योजना खूप महत्त्वपूर्ण असून यामध्ये एकदा तुम्ही पैशांची गुंतवणूक केली

तर तुम्हाला दर महिन्याला एक निश्चित उत्पन्न मिळण्याचे हमी मिळते. विशेष म्हणजे या योजनेच्या अंतर्गत तुम्ही तुमची पत्नी किंवा भाऊ, कुटुंबातील कोणत्याही सदस्या सोबत खाते उघडू शकतात व त्यात जमा होणाऱ्या रकमेची मर्यादा देखील वाढवता येऊ शकते.

 एक रक्कमी ठेव ठेवल्यावर मिळते दरमहा उत्पन्न

ही एक ठेव योजना असून यामध्ये एकरकमी ठेव ठेवल्यावर प्रत्येक महिन्याला निश्चित उत्पन्न मिळते. तसेच या योजनेच्या खात्यावर जे काही व्याज मिळते ते प्रत्येक महिन्याला पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामध्ये भरले जाते व एवढेच नाही तर पाच वर्षानंतर तुम्ही जी काही रक्कम जमा करतात ती रक्कम काढू देखील शकतात.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये सिंगल आणि संयुक्त म्हणजेच जॉइंट खाते उघडण्याचा पर्याय मिळतो. तुम्हाला जर संयुक्त खाते उघडायचे असेल तर ते तुम्ही दोन किंवा तीन व्यक्ती मिळून उघडू शकतात.

तुम्ही एका खात्यामध्ये नऊ लाख रुपये आणि संयुक्त खाते असेल तर 15 लाख रुपये जमा करू शकतात. जर तुम्ही आणि तुमची पत्नी मिळून संयुक्त खाते उघडले तर व्याजातून पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न तुम्हाला मिळू शकते.

 पती पत्नी वर्षाला कमवू शकतात व्याजातून एक लाख

सध्या पोस्ट ऑफिसच्या या मंथली इन्कम स्कीम मध्ये 7.4 टक्के दराने व्याज मिळत असून तुम्ही तुमच्या पत्नीसह यामध्ये 15 लाख रुपये जमा केले तर मिळणाऱ्या 7.4% व्याजदरामुळे प्रत्येक महिन्याला तुम्हाला 9250 रुपयांचे निश्चित उत्पन्न मिळते.

म्हणजेच या हिशोबानुसार एका वर्षात एक लाख 11 हजार रुपयांच्या उत्पन्नाची हमी तुम्हाला मिळते. याप्रमाणे तुम्ही पाच वर्षचा हिशोब केला तर तुम्हाला पाच लाख 55 हजार रुपये इतके उत्पन्न मिळते.

 सिंगल खात्यात जास्तीत जास्त किती रक्कम करता येते जमा?

समजा तुम्ही या योजनेमध्ये संयुक्त खात्याव्यतिरिक्त सिंगल खाते उघडले तर यामध्ये तुम्ही कमाल नऊ लाख रुपये इतकी रक्कम जमा करू शकतात व या रकमेवर तुम्हाला प्रत्येक महिन्याला पाच हजार पाचशे पन्नास रुपये व्याज मिळते. अशाप्रकारे तुम्ही एका वर्षात व्याजापोटी 66 हजार 600 रुपये मिळू शकतात पाच वर्षात निव्वळ व्याज तुम्हाला तीन लाख 33 हजार रुपये मिळेल.

 कुणाला घेता येतो या योजनेचा लाभ?

1- देशातील कोणत्याही नागरिकाला पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमचा फायदा घेता येतो. तसे यामध्ये मुलाच्या नावाने देखील खाते उघडता येते.

2- मुलाच्या नावाने खाते उघडायचे असेल तर त्याचे वय दहा वर्षापेक्षा कमी असेल तर त्याची पालक किंवा कायदेशीर पालक त्याच्या नावाने खाते उघडू शकतात.

3- जेव्हा मूल दहा वर्षाचे होते तेव्हा त्याला स्वतः खाते चालवण्याचा अधिकार मिळू शकतो.

4- या योजनेकरिता पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe