Public Provident Fund : सध्या पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांनी संख्या खूप जास्त आहे. येथे गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगले व्याज मिळतातच यासोबत इतरही फायदेही मिळतात. यापैकी एक म्हणजे कर्ज सुविधा. पीपीएफवरील कर्ज वैयक्तिक कर्जापेक्षा खूपच स्वस्त आहे.
म्हणजे, संकटाच्या वेळी अचानक पैशांची गरज भासली तर, तुम्हाला तुमची कोणतीही पॉलिसी मोडण्याची गरज नाही, तुम्ही पीपीएफ मधूनसहज कर्ज घावरून तुमची गरज पूर्ण करू शकता. पण, पीपीएफ कर्जाबाबत काही नियम आहेत, जे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. चला पीपीएफ कर्जाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.
पीपीएफ कर्जाची चांगली गोष्ट म्हणजे ते खजगी कर्जापेक्षा खूप स्वस्त दरात मिळते. यासाठी तुम्हाला काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. याचे कारण म्हणजे हे कर्ज तुम्हाला तुमच्या PPF खात्यात जमा केलेल्या रकमेच्या आधारे दिले जाते. कर्जाच्या व्याजदरांबद्दल बोलायचे झाल्यास, नियमांनुसार, पीपीएफ खात्यावरील कर्जावरील व्याज हे पीपीएफ खात्यावरील व्याजापेक्षा एक टक्का जास्त आहे. म्हणजेच, सध्या तुम्हाला तुमच्या PPF खात्यावर 7.1 टक्के दराने व्याज मिळत असेल, तर कर्जावरील व्याज 8.1 टक्के असेल. तर वैयक्तिक कर्जाचा व्याजदर 10.50% ते 17 किंवा 18% पर्यंत असू शकतो.
पीपीएफ कर्ज घेतल्यानंतर, तुम्हाला ते परत करण्यासाठी चांगला वेळ दिला जातो. तुम्ही ही कर्जाची रक्कम तीन वर्षांत म्हणजे 36 हप्त्यांमध्ये परत करू शकता. तुम्हाला किती हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड करायची आहे हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. सर्वप्रथम तुम्हाला कर्जाची मूळ रक्कम भरावी लागते. नंतर पेमेंट कालावधीनुसार व्याज मोजले जाते. या व्यतिरिक्त, जर तुम्हाला मधल्या कोठून एकरकमी रक्कम मिळाली तर तुम्ही ती रक्कम एकाच वेळी भरून परत करू शकता. परंतु जर तुम्ही 36 महिन्यांच्या आत कर्जाची परतफेड करू शकला नाही, तर दंड म्हणून तुम्हाला पीपीएफवर उपलब्ध असलेल्या व्याजापेक्षा 1 टक्के अधिक व्याजदराने कर्जाची परतफेड करावी लागेल.
कर्जाच्या महत्वाच्या अटी :-
-पीपीएफ खाते किमान एक आर्थिक वर्ष जुने असले पाहिजे, तरच तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता.
-पीपीएफ खात्याची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यावर कर्जाची सुविधा उपलब्ध नसते कारण त्यानंतर तुम्ही रक्कम अर्धवट काढू शकता.
-पीपीएफ खात्यात उपलब्ध असलेल्या रकमेपैकी केवळ 25% रक्कम तुम्ही कर्ज म्हणून घेऊ शकता.
-तुम्ही पीपीएफ खात्यावर एकदाच कर्ज घेऊ शकता. तुम्ही आधीच्या कर्जाची परतफेड केली असली तरीही तुम्हाला या खात्यावर पुन्हा कर्जाची सुविधा मिळत नाही.
-यासाठी तुम्हाला पीपीएफ खाते उघडलेल्या बँकेच्या शाखेत जाऊन फॉर्म भरा आणि कर्जासाठी अर्ज करावा लागेल. एसबीआयमध्ये यासाठी फॉर्म डी वापरला जातो.
-यासोबतच कर्जाची रक्कम आणि परतफेडीचा कालावधी अर्जात लिहावा लागेल.
-जर तुम्ही याआधी कर्ज घेतले असेल तर तुम्हाला ते देखील नमूद करावे लागेल. यानंतर पीपीएफ पासबुक जमा करावे लागेल. संपूर्ण प्रक्रियेनंतर साधारण आठवडाभरात कर्ज मंजूर होते.