PPF Scheme : पोस्ट ऑफिसची आकर्षक योजना! ‘या’ योजनेत करा गुंतवणूक मिळतील 40 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:
PPF Scheme

PPF Scheme : भविष्याचा विचार करून अनेकजण योग्य गुंतवणुकीच्या शोधात आहे. जास्त परतावा आणि कोणतीही जोखीम नसणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास अनेकांचा कल असतो. सध्या पोस्ट ऑफिसद्वारे अनेक प्रकारच्या बचत योजना राबवल्या जात आहेत.

तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला त्या योजनेची संपूर्ण माहिती असावी. पोस्ट ऑफिसची अशीच एक योजना आहे ज्यात तुम्ही प्रत्येक महिन्याला 12,500 रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 40 लाख रुपये मिळतील.

गुंतवणूक

जर तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तर काळजी करू नका. आता तुम्ही या योजनेत 100 रुपये देऊनही खाते उघडू शकता. अशीच एक पोस्ट ऑफिस छोटी बचत योजना आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. या योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्षांचा आहे.

जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुक करायची असेल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना 7 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देण्यात येतो. तुम्हाला या योजनेत एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत म्हणजेच प्रत्येक महिन्याला 12,500 रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. त्यामुळे जर तुम्हाला लाखो रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती गुंतवणूक करावी? किती काळासाठी गुंतवणूक करावी हे माहिती असावे.

जाणून घ्या फायदे

  • या योजनेत तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह खाते बंद करण्याचा फॉर्म सबमिट करून मॅच्युरिटी पेमेंटचा दावा करता येतो.
  • हे लक्षात ठेवा की तुम्हाला वर्षातून एकदा पैसे काढता येतात.
  • इतकंच नाही तर तुम्हाला गुंतवणुकीची मर्यादा आणखी पाच वर्षांसाठी वाढवता येईल.

असे मिळवा 40 लाख रुपये

गुंतवणूकदारांना या बचत योजनेत, पोस्ट ऑफिस एकूण 7.1% वार्षिक व्याज देत आहे. गणनेनुसार, समजा तुम्ही महिन्यासाठी 12500 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 15 वर्षांनी मॅच्युरिटीवर 40,68,209 रुपये मिळतात. या योजनेतील एकूण गुंतवणूक 22.5 लाख रुपये असल्यास व्याज 18,18,209 रुपये इतके होईल.

म्हणजेच एका आर्थिक वर्षात या योजनेत 500 ते 1,50,000 रुपयांची गुंतवणूक करता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे १८ वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत खाते चालू करू शकतो. इतकेच नाही तर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गतही गुंतवणूकदारांना सवलत मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe