३० गुंठ्यांत घेतले १० टन टरबुजाचे उत्पादन ; पठ्याने कमावले तब्ब्ल ‘एवढे’ रूपये

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-पारंपरिक शेतीमध्ये जास्त उत्पादन आणि उत्पन्न राहिले नाही हे आता जवळपास काही शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे.

मोठ्या प्रमाणावर बी बियाणे , औषधे, किटकनाशके यां सारख्या गोष्टीवर पारंपरिक शेती मध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. अश्यातच हवामानाचा आता काही अंदाज बांधता येत नाही.

हिवाळ्यात पाऊस तर उन्हाळ्यात थंडी अशी गत हवामानाची झाली आहे. या मुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसतो आणि केलेले काबाडकष्ट धुळीत मिळले जाते.

परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानातून जर शेती केली आणि मार्केटिंगचे तंत्र शिकून योग्य रित्या जर पीक घेतले तर शेतकरी दर्जेदार पीक घेऊ शकतो. या मुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो.

असाच एक यशस्वी प्रयोग बीड मधील आंबेजोगाईतील देवळा या गावातील प्रयोगशील शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी आपल्या शेतामध्ये केला आहे. रवींद्र देवरवाडे हा तरुण प्रयोगशील शेतकरी म्हणून फेमस आहे.

त्याने आपल्या शेतामधील टरबुजाला डायरेक्ट दुबई येथे निर्यात केले आहे. यामधून त्याने लाखोंचे उत्पादन घेतले आहे. दुबई आणि तैवान या देशांमध्ये टरबूज हे फळ आवडीने खाल्ले जाते.

हे ओळखून देवरवाडे यांनी नियोजन पद्धतीने टरबुजाचे पीक घेतले. त्यांनी नॉन यु सीड्स आरोही आणि विशाल या वाणाचे पीक लावले. तीन महिन्यानंतर हे पीक पूर्णत्वाला येऊन त्यांनी त्याची विक्री आणि निर्यात दुबई येथे केली आहे. यातून त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे.