Property Loan: घर किंवा इतर मालमत्ता तारण ठेवून कर्ज घ्या पण…. अगोदर ‘या’ गोष्टींचा विचार करा! नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप

तुम्ही तुमची जमीन किंवा घर इत्यादी मालमत्ता तारण ठेवून कर्ज मिळवू शकतात. परंतु तुम्ही जर तुमची अमूल्य अशी मालमत्ता बँकेकडे तारण ठेवून जर कर्ज घेत असाल तर ते खूप काळजीपूर्वक आणि पुढचा विचार करून घेणे गरजेचे असते.

Ajay Patil
Published:
property loan

Property Loan:- आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा व्यवसाय उभारणीसाठी आपल्याला पैशांची गरज भासते. याकरिता आपण बँक किंवा इतर माध्यमातून पैसे उभारण्यासाठी प्रयत्न करतो. बँकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर बँकांच्या माध्यमातून आपल्याला वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन देखील मिळते.

परंतु याकरिता तुमच्याकडे नोकरी असणे गरजेचे असते. तुमच्याकडे जर नोकरी नसेल तर मात्र तुम्ही मालमत्ता तारण ठेवून म्हणजेच प्रॉपर्टी मॉर्गेज लोन घेऊ शकतात.

यामध्ये तुम्ही तुमची जमीन किंवा घर इत्यादी मालमत्ता तारण ठेवून कर्ज मिळवू शकतात. परंतु तुम्ही जर तुमची अमूल्य अशी मालमत्ता बँकेकडे तारण ठेवून जर कर्ज घेत असाल तर ते खूप काळजीपूर्वक आणि पुढचा विचार करून घेणे गरजेचे असते.

थोडी जरी चूक झाली तरी देखील तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून खूप मानसिक त्रास होऊ शकतो किंवा तुम्ही तुमची मालमत्ता देखील गमावू शकता. त्याकरिता तुम्ही प्रॉपर्टी लोन म्हणजेच मालमत्ता तारण ठेवून कर्ज घेण्याअगोदर स्वतःला काही प्रश्न विचारणे खूप गरजेचे असते.

 घर किंवा इतर प्रॉपर्टी तारण ठेवून कर्ज घ्या, अगोदर या गोष्टींचा विचार करा

1- कर्ज का हवे आहे?- तुम्हाला जर मालमत्ता तारण ठेवून म्हणजेच प्रॉपर्टी लोन घ्यायचे असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला कर्जाची गरज का आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. तुम्ही जे कर्ज घेणार आहात त्याचा तुमच्या एकंदरीत सगळ्या परिस्थितीवर काय काय परिणाम होऊ शकतो? या गोष्टी देखील व्यवस्थित समजून घेणे गरजेचे आहे.

म्हणजेच तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे? हे लक्षात घेऊनच प्रॉपर्टी लोन घ्यावे. तुम्ही व्यवसाय करिता जर कर्ज घेत असाल आणि व्यवसाय जर फसला तर तुम्ही घेतलेले कर्ज कोणत्या पद्धतीने फेडणार? याचा बी प्लान तुमच्याकडे तयार असणे गरजेचे आहे व या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही निर्णय घ्यावा.

2- घेतलेले कर्ज फेडले नाही तर प्रॉपर्टी लोन हे सुरक्षित प्रकारातले कर्ज आहे. यामध्ये बँक तुम्हाला कर्ज देते. परंतु त्या बदलात तुमची मालमत्ता बँकेकडे तारण म्हणजेच गहाण ठेवलेली असते.

काही प्रसंगी तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यामध्ये जर असमर्थ ठरला तर मात्र तुमची प्रॉपर्टी तुम्ही गमावू शकतात. कारण बँकेकडे तारण ठेवलेल्या प्रॉपर्टीची जप्ती किंवा लिलाव बँकेच्या माध्यमातून केला जाऊ शकतो व या माध्यमातून बँक त्यांचे पैसे वसूल करू शकते. त्यामुळे जरा विचार करूनच प्रॉपर्टी लोन घ्यावे.

3- प्रॉपर्टी लोन घेताना कुठले शुल्क लागते याचा विचार करा आपण प्रॉपर्टी लोन घेतो तेव्हा अनेक प्रकारचे शुल्क त्यावर आकारले जाते. त्यामुळे तुम्ही प्रॉपर्टी लोन घेण्याअगोदर त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे चार्जेस लागतात किंवा आकारले जातात याची संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे.

प्रॉपर्टी लोन वर प्रक्रिया शुल्क तसेच मालमत्तेच्या मूल्याच्या मूल्यांकनासाठी मूल्यांकन शुल्क, कागदपत्रांसाठी लागणारा आवश्यक कायदेशीर खर्च आणि पडताळणी यासारख्या शुल्काचा यामध्ये समावेश होतो.

कायदेशीर कागदपत्रांमध्ये मुद्रांक शुल्क तसेच मालमत्ता नोंदणी शुल्क आणि गहाणखत यांचा देखील समावेश होतो. त्यामुळे प्रॉपर्टी लोन घेताना या सगळ्या गोष्टींचा विचार करणे खूप गरजेचे आहे.

4- प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यांकन जेव्हा कुठलीही बँक मालमत्तेच्या आधारे कर्ज देते तेव्हा त्या मालमत्तेचे म्हणजेच प्रॉपर्टीचे मूल्यांकन म्हणजेच व्हॅल्युएशन किती आहे त्याच्या आधारे कर्ज देत असते.

एखाद्या प्रसंगी जर मालमत्तेच्या मूल्यांमध्ये घट झाली असेल तर अशा परिस्थितीत कर्जदाराला मालमत्तेच्या सध्याच्या मूल्यापेक्षा जास्त पैसे भरावे लागू शकतात. प्रॉपर्टीच्या मूल्यात घट झाली असेल तर नकारात्मक इक्विटी त्यामुळे होऊ शकते.

याकरिता या गोष्टींचा बारकाईने विचार करूनच प्रॉपर्टी लोन घ्यावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe