दीड लाखापर्यंत भांडवल टाका आणि सुरू करा हे व्यवसाय! आयुष्यभर लाखोत मिळत राहील पैसा आणि जगाल समृद्ध आयुष्य

व्यवसाय निवडताना तो कमी गुंतवणुकीत चांगला नफा देईल आणि आयुष्यभर आपण तो व्यवसाय व्यवस्थितरित्या करू शकू अशा व्यवसायाची निवड ही खूप महत्त्वाची ठरते. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून जोखीम पत्करण्यापेक्षा एखादा कमी गुंतवणुकीचा व्यवसाय शोधणे खूप गरजेचे आहे.

Ajay Patil
Published:
business idea

Low Investment Business Idea: कमीत कमी गुंतवणुकीमध्ये उत्तम असा व्यवसाय शोधणे व त्या व्यवसायाच्या माध्यमातून योग्य नियोजनाने चांगला पैसा मिळवणे खूप गरजेचे असते.

व्यवसाय निवडताना तो कमी गुंतवणुकीत चांगला नफा देईल आणि आयुष्यभर आपण तो व्यवसाय व्यवस्थितरित्या करू शकू अशा व्यवसायाची निवड ही खूप महत्त्वाची ठरते. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून जोखीम पत्करण्यापेक्षा एखादा कमी गुंतवणुकीचा व्यवसाय शोधणे खूप गरजेचे आहे.

कमीत कमी भांडवलात सुरू होणाऱ्या व्यवसायांची यादी बघितली तर ती खूप मोठी आहे. परंतु बाजारपेठेची मागणी आणि इतर परिस्थितींचा अभ्यास करून व्यवसायाची निवड करणे खूप फायद्याचे ठरते.

या अनुषंगाने आपण या लेखामध्ये असे काही व्यवसाय बघणार आहोत जे तुम्ही दीड ते दोन लाख रुपये गुंतवणूक करून सुरु करू शकतात व आयुष्यभर चांगल्या प्रकारे पैसा मिळवू शकतात.

 दीड ते दोन लाख रुपये भांडवलात सुरू करा हे व्यवसाय आणि मिळवा आयुष्यभर लाखोत पैसे

1- बेकरी शॉप कमी गुंतवणुकीमध्ये तुम्हाला जर प्रचंड प्रमाणात नफा मिळवायचा असेल तर बेकरी व्यवसाय हा खूप चांगला पर्याय आहे. आजकालच्या कालावधीमध्ये केक आणि बेक केलेले पदार्थांची मागणी खूप मोठी असून या पदार्थांच्या विक्री व्यवसायातून तुम्ही चांगला नफा मिळवू शकतात.

हा व्यवसाय उभारण्याकरिता साधारणपणे दोन लाख रुपयांची गुंतवणूक करून एका लहानशा जागेत किंवा भाड्याने जागा घेऊन देखील तुम्ही व्यवसायला सुरुवात करू शकतात. बेकरी उत्पादने बनवण्याकरिता जास्त खर्च येत नाही. परंतु बेकरी उत्पादनांच्या विक्रीतून मात्र खूप चांगला प्रकारे पैसा मिळवता येतो.

2- केटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय आजकालच्या कालावधीत केटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायामध्ये देखील खूप चांगल्या प्रकारच्या संधी आहेत. आपल्याला माहित आहे की अनेक लोकांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते व या कार्यक्रमाचे नियोजन व इतर गोष्टींकरिता दुसऱ्या व्यक्तींना त्या कार्यक्रमाच्या नियोजनाचे सगळे सूत्र दिले जातात.

यामध्ये जर तुमचे टीमवर्क चांगले असेल व तुम्ही टीमवर्क मध्ये कुशल असाल तर तुमच्यासाठी हा व्यवसाय खूप चांगली संधी आहे. या व्यवसायामध्ये तुम्ही अनेक कार्यक्रमांचे कंत्राट घेऊन या व्यवसायाला सुरुवात करू शकतात.

इव्हेंट आणि केटरिंग मॅनेजमेंट व्यवसायामध्ये तुमच्याकडे कुशल स्वयंपाकींची टीम असणे खूप गरजेचे आहे. साधारणपणे दीड लाख रुपये गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

3- उपकरणे भाड्याने देण्याचा व्यवसाय हा व्यवसाय देखील खूप फायद्याचा असून ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय चालू शकतो. या व्यवसायामध्ये तुम्ही विविध प्रकारचे उपकरणे भाड्याने देऊन त्या माध्यमातून चांगला पैसा मिळवू शकता.

यामध्ये तुम्ही बांधकामाचे साधने, इव्हेंट आयटम तसेच शेतीसाठी लागणारी उपकरणे, वाहने किंवा इतर मौल्यवान वस्तू भाड्याने देऊन त्या माध्यमातून पैसा मिळवू शकतात. साधारणपणे दोन लाख रुपये भांडवलात तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकतात.

4- टॅक्सी किंवा कार सेवा तुमच्याकडे कार असेल व तिचा वापर तुम्ही जास्त प्रमाणात करत नसाल तर तुम्ही कार भाड्याने देऊन देखील चांगला पैसा मिळवू शकतात. मोठ्या शहरांमध्ये तुम्ही ओला आणि उबेर सारख्या राईड शेअरिंग कंपन्यांना तुमचे वाहन भाड्याने देऊ शकता किंवा महिन्याची ठराविक रक्कम ठरवून देऊन त्यामाध्यमातून चांगला पैसा मिळवू शकतात.

समजा तुमच्याकडे वाहन नाहीतर तुम्ही दोन लाख रुपये गुंतवणूक करून चांगली कार खरेदी करू शकता व या माध्यमातून देखील अतिरिक्त पैसे कमवू शकतात. तसेच तुम्ही स्वतः देखील लोकांना भाडेतत्त्वावर वाहन देऊन या माध्यमातून चांगला पैसा मिळवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe