RBI Benchmark Bond : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच नवीन बेंचमार्क बाँड्सची घोषणा केली जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सोमवारी या बाँड्सची घोषणा केली जाणार आहे. 7 ऑगस्ट रोजी आरबीआय नवीन बाँड्सची घोषणा करणार आहे.
आरबीआयकडून जाहीर करण्यात येणाऱ्या बाँड्सचे कूपन 7.10% आणि 7.20% दरम्यान असू शकते, तसेच या बाँडची घोषणा १० वर्षांसाठी केली जाऊ शकते. याबाबत आरबीआय लवकरच अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मध्यवर्ती बँकेच्या आकडेवारीनुसार, 7.26 टक्के 2023 वर विद्यमान 10 वर्षांच्या रोखे उत्पन्नावरील थकबाकीची रक्कम 15 दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे. आरबीआयच्या बेंचमार्क बाँडला 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता आणखी एक नवीन बाँड आरबीआय लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
आरबीआयकडून लॉन्च करण्यात येणाऱ्या बेंचमार्क बाँडचे कूपन 7.10% आणि 7.20% दरम्यान असण्याची शक्यता मनी मार्केट डीलर्सने वर्तवली आहे. तसेच LIC म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंटचे फंड मॅनेजर संजय पवार यांच्या अंदाजानुसार बाँडवर 3-5 बेस पॉइंट्सची सूटही मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आरबीआयकडून आगोदर जारी करण्यात आलेल्या बेंचमार्क बाँडचे कूपन 7.26% निश्चित केले होते. या बेंचमार्क बाँडचे कूपनद्वारे 12 कोटी रुपये उभे केले गेले होते.
लिलावादरम्यानची बोली डीलर्सनुसार अनेक किंमतींमध्ये असेल. एकाधिक किंमत पद्धती अंतर्गत, यशस्वी बोलीदारांना त्यांनी ज्या दराने बोली लावली आहे त्या दराने वाटप केलेल्या सरकारी रोख्यांसाठी पैसे द्यावे लागतील.