LIC Policy: एलआयसीच्या ‘या’ पॉलिसीत दरमहा 1358 रुपये रुपये जमा करा आणि मिळवा 25 लाख रुपयाचा फंड! मिळतील अनेक फायदे

LIC Policy:- भारतीय आयुर्विमा  महामंडळ अर्थात एलआयसी भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे व या कंपनीच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवण्यात येतात त्या गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या दृष्टिकोनातून लोकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहेत.

आपल्याला माहित आहे की, एलआयसीच्या माध्यमातून लहान मुले ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक प्रकारच्या आकर्षक अश्या पॉलिसी राबवल्या जातात व या पॉलिसींच्या साह्याने चांगल्या प्रकारे पैसाही जमा करता येतो व त्यासोबत अनेक फायदे देखील मिळतात.

एलआयसीचे अनेक पॉलिसी अशा प्रकारच्या आहेत की यामध्ये कमीत कमी गुंतवणूक करून देखील खूप मोठ्या प्रमाणावर पैसा जमा करता येतो. त्यामुळे या लेखामध्ये आपण अशाच एका पॉलिसीची माहिती घेणार आहोत ज्यामध्ये तुम्ही छोटीशी रक्कम जमा करून चांगला परतावा मिळवू शकतात. इतकेच नाही तर या ऐवजी तुम्हाला या माध्यमातून इतर फायदे देखील मिळतात.

 एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी आहे महत्त्वाची

एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी ही एक खूप महत्त्वाची पॉलिसी असून यामध्ये तुम्ही दररोज फक्त 45 रुपयांची बचत केली तरी तुम्ही 25 लाख रुपये काही कालावधीनंतर मिळवू शकतात. समजा तुम्हाला एलआयसीचा प्लान घ्यायचा असेल व तुम्ही अशा प्लॅनच्या शोधात आहात की कमी प्रीमियम मध्ये चांगला निधी जमा होईल.

तर याकरिता तुमच्यासाठी एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी उत्तम पर्याय आहे. ही पॉलिसी एक प्रकारे टर्म पॉलिसी सारखी असून तोपर्यंत तुमची पॉलिसी सुरू आहे तोपर्यंत तुम्ही यामध्ये प्रीमियम भरू शकतात. एवढेच नाही तर यामध्ये पॉलिसी धारकाला एक ऐवजी अनेक मॅच्युरिटीचे फायदे मिळतात. यामध्ये तुम्हाला कमीत कमी एक लाख रुपयांची हमी मिळते तर यामध्ये जास्तीत जास्तची म्हणजेच कमाल मर्यादा कुठलीही निश्चित नाही.

 अशाप्रकारे जमा करू शकतात पंचवीस लाख

समजा या पॉलिसीमध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला 1358 रुपये जमा केले तर 25 लाख रुपयांचा फंड तुम्ही यामध्ये मिळवू शकतात. याकरिता तुम्हाला प्रत्येक दिवसाला 45 रुपयांची बचत करावी लागेल. एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी ही एक दीर्घकालीन योजना असून हिचा टर्म 15 ते 35 वर्षांपर्यंतचा आहे.

म्हणजे दररोज 45 रुपये वाचवून या पॉलिसीच्या माध्यमातून 35 वर्षासाठी गुंतवणूक केली तर या योजनेच्या परिपक्वता कालावधीनंतर 25 लाख रुपये तुम्हाला मिळतील. म्हणजेच याकरिता तुम्हाला वार्षिक आधारावर बघितले तर सोळा हजार तीनशे रुपयांची बचत करावी लागेल.

 मिळतो बोनसचा लाभ

जर तुम्ही या पॉलिसीमध्ये 35 वर्षांकरिता प्रत्येक वर्षाला 16300 रुपयांची गुंतवणूक केली तर तुमचे एकूण पाच लाख 70 हजार पाचशे रुपये जमा होतात. म्हणजेच या पॉलिसीच्या मुदतीनुसार बघितले तर तुमची मूळ विम्याची रक्कम पाच लाख रुपये असेल.

परंतु यामध्ये या पॉलिसीच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर आठ लाख साठ हजार रुपयांचा रिविजनरी बोनस आणि 11.50 लाख रुपयांचा बोनस देखील तुम्हाला मिळतो. एलआयसीच्या या जीवन आनंद प्लानमध्ये तुम्हाला दोनदा बोनसचा फायदा मिळतो. परंतु यामध्ये पॉलिसीचा कालावधी पंधरा वर्षांचा असणे गरजेचे आहे.

 इतर कोणते फायदे मिळतात?

जीवन आनंद पॉलिसी धारकाला या योजनेच्या माध्यमातून चार प्रकारचे रायडर्स मिळतात. ते रायडर्स म्हणजे अपघाती मृत्यू आणि अपंगत्व, अपघात लाभ रायडर्स, नवीन टर्म इन्शुरन्स रायडर आणि नवीन गंभीर लाभ रायडरचा समावेश आहे.

यामध्ये जर आपण मृत्यूनंतर मिळणारा फायदा म्हणजेच डेथ बेनिफिट पाहिला तर पॉलिसीधारकाच्या कोणत्याही कारणास्त मृत्यू झाल्यानंतर पॉलिसी धारकाच्या नॉमिनीला पॉलिसीचा 125% डेथ बेनिफिट मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe