Business Success Story:- भारतामध्ये अनेक स्टार्टअप आहेत व त्यातील काही स्टार्टअप भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध झालेली आहेत. परंतु जर आपण या स्टार्टअप च्या सुरुवातीचा इतिहास पाहिला तर अनंत अडचणींनी आणि खाचखडग्यांनी भरलेला असून अशा प्रकारच्या स्टार्टअपच्या संस्थापकांनी अतिशय कष्ट
आणि मेहनतीने सर्व परिस्थितीवर मात करत आणि यशाच्या रस्त्यात आलेल्या संकटांना तोंड देत आज या परिस्थितीपर्यंत स्टार्टअप पोचवलेले आहेत. कुठली गोष्ट ही सहजासहजी होत नसते हे आपल्याला अशा प्रकारच्या स्टार्टअपच्या यशोगाथेवरून दिसून येते.
याच मुद्द्याला धरून जर आपण सगळ्यांना माहिती असलेल्या ड्रीम 11 या ऑनलाइन ॲप बद्दल माहिती आहे. परंतु या एप्लीकेशनची सुरुवात किंवा आज ज्या यशापर्यंत ड्रीम 11 पोहोचलेली आहे त्याचा जर प्रवास पाहिला
तर तो अत्यंत खडतर आणि मेहनतीने परिपूर्ण असा आहे. याकरिता ड्रीम 11 चे संस्थापक आणि सीईओ हर्ष जैन यांनी प्रचंड मेहनत घेऊन ड्रीम 11 ला या शिखरापर्यंत पोहोचवले आहे.
ड्रीम 11 ऑनलाईन ॲप्सची सुरुवात कशी झाली?
आज जर आपण भारताचा विचार केला तर अगदी लहान मुलं ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना ड्रीम 11 माहिती आहे. या एप्लीकेशनच्या मदतीने हॉकी तसेच फॅन्सी क्रिकेट आणि फुटबॉल, कबड्डी यासारख्या अनेक खेळांवर बेटिंग केली जाते
व अनेक लोकांनी या एप्लीकेशनच्या माध्यमातून हजारो ते लाखो रुपयांची कमाई केल्याचा दावा देखील या कंपनीच्या माध्यमातून किंवा जाहिरातींमधून केला जातो हे देखील आपल्याला माहिती आहे.
परंतु अशा पद्धतीने एप्लीकेशनचे निर्मिती किंवा कंपनीची उभारणी करणे हे पाहिजे तितके सोपे नव्हते. परंतु या सगळ्या कठीण प्रवास सोपा करण्यामागे कष्ट उपसले ते हर्ष जैन आणि भावित सेठ या दोन्ही मित्रांनी व दोघे मिळून ड्रीम इलेव्हन ची सुरुवात केली.
अशी सुचली कल्पना?
2018 मध्ये जेव्हा इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल सुरू झाले अगदी तेव्हाच हर्ष आणि भावित या दोन्ही मित्रांना ड्रीम 11 सुरू करण्याची कल्पना मनात आली. याकरिता या दोघांनी स्पोर्टा टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत ड्रीम 11 ची स्थापना केली व त्यानंतर मात्र अडचणींचा डोंगर त्यांच्यासमोर उभा राहिला.
या सगळ्या अडचणींना तोंड देत देत नाकी नऊ आले. कारण निधीसाठी अनेक समस्या त्यांना आल्या. या कंपनीला निधी मिळावा याकरिता दोन वर्षाच्या कालावधीत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 150 भांडवलदारांशी त्यांनी संपर्क केला.
परंतु त्यांची ही कल्पना कोणालाच आवडली नाही व सगळ्यांनी त्यांना नकार दिला. त्यानंतर 2012 मध्ये क्रिकेट प्रेमींसाठी त्यांनी फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्मची सुरुवात केली व त्या ठिकाणी देखील अनेक अडचणी आणि अपयश येत गेले.
परंतु या अपयशांचा यशस्वीपणे सामना करत या दोन्ही मित्रांच्या कंपनीला 2020 च्या आयपीएलचे स्पॉन्सरशिप राइट्स मिळाले व इथूनच या कंपनीची खरी सुरुवात झाली व त्यानंतर मात्र कंपनीने मागे फिरून पाहिले नाही.
आज आहे 65 हजार कोटींची कंपनी
अशाप्रकारे असंख्य अडचणी आणि समस्यांना तोंड देत हर्ष आणि भावीत दोघे मित्रांनी सुरू केलेल्या ड्रीम 11 चे आजचे जर मूल्यांकन म्हणजेच व्हॅल्युएशन पाहिले तर ते 65 हजार कोटींपेक्षा जास्त असून आज या कंपनीचे 150 मिलियन पेक्षा जास्त ऍक्टिव्ह युजर आहेत.
या ॲप्लिकेशनवर क्रिकेटच नाही तर बास्केटबॉल तसेच कबड्डी आणि फुटबॉल सारख्या खेळांवर पैसे लावले जातात. 800 पेक्षा जास्त कर्मचारी सप्टेंबर 2022 पर्यंत या कंपनीकडे होते.
जर आपण 2022 या आर्थिक वर्षाचा विचार केला तर हर्ष आणि भावित यांच्या या स्टार्टअपने 3841 कोटी रुपयांची कमाई केलेली होती.
अशा पद्धतीने अगदी शून्यातून ड्रीम 11 ची सुरुवात या दोघा मित्रांनी केली व असंख्य अडचणींना तोंड देत आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी कष्ट उपसले व आज काही हजार कोटींच्या घरात ही कंपनी पोहचवली.