आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र असून ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डचा वापर आता प्रत्येक ठिकाणी केला जातो. एक वैध ओळखपत्र म्हणून देखील आधार कार्ड आता वापरले जाते.
आधार कार्डवर असलेल्या बारा अंकी नंबरच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचा संपूर्ण तपशील आपल्याला कळत असतो. परंतु बऱ्याचदा काही कामांसाठी आधार कार्ड न पाहता फक्त बारा अंकी आधार क्रमांक दिला जातो व त्यावर अगदी डोळे झाकून आपण विश्वास ठेवत असतो.

परंतु समोरच्या व्यक्तीकडून दिला गेलेला नुसता आधार क्रमांक हा योग्य असेलच असे नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता जर तुम्हाला एखादे व्यक्तीला घर भाड्याने द्यायचे असेल किंवा एखादा व्यक्ती कामावर कर्मचारी म्हणून ठेवायचा असेल तर प्रामुख्याने अशा व्यक्तीकडून आधार कार्ड हे ओळखीचा पुरावा म्हणून बघितले जाते.
परंतु यामध्ये बऱ्याचदा आधार कार्ड न देता नुसता आधार क्रमांक दिला जातो व तो आपण कुठलाही तपास न करता योग्य मानतो. परंतु देण्यात आलेला प्रत्येक 12 अंकी क्रमांक हा आधार नसतो हे यामध्ये लक्षात घेणे गरजेचे आहे.
त्यामुळे तुम्ही जर तुमचे घर भाड्याने देत असाल किंवा तुमच्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी एखादा व्यक्तीला कर्मचारी म्हणून कामावर ठेवत असाल तर तुम्ही संबंधित व्यक्तीने दिलेल्या क्रमांकावर विश्वास न ठेवता त्याचे आधार क्रमांकाची पडताळणी करणे खूप गरजेचे आहे.
या पडताळणीच्या माध्यमातून तुम्हाला संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड बनावट आहे की खरे हे लागलीच कळु शकते. त्यामुळे भविष्यकाळात होणाऱ्या त्रासापासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकतात. त्यामुळे या लेखांमध्ये आपण आधार पडताळणी कशी करावी यासंबंधीची माहिती घेणार आहोत.
अशा पद्धतीने करा आधारची पडताळणी
1- याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला युआयडीएआयच्या uidai.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.
2- त्या ठिकाणी गेल्यानंतर माय आधार विभागातील आधार सेवा या विभागामध्ये आधार क्रमांक सत्यापित करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
3- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल व त्या ठिकाणी असलेला आधार क्रमांक आणि सुरक्षा कोड नमूद करावा आणि व्हेरिफाय वर क्लिक करावे.
4- त्यानंतर तुम्ही टाकलेला बारा अंकी क्रमांक आधार क्रमांक असेल आणि तो निष्क्रिय केला नसेल तर तुमचा आधार क्रमांक अस्तित्वात असल्याचे आणि कार्यरत असल्याची स्थिती तुम्हाला वेबसाईटवर दाखवली जाईल व या माध्यमातून तुम्हाला कळेल की तुम्हाला देण्यात आलेला आधार क्रमांक आधार आहे की नाही.
एम–आधार एप्लीकेशनच्या माध्यमातून करा पडताळणी
1- आधार कार्डवर क्यूआर कोड असतो व त्याचा वापर तुम्ही आधार कार्ड पडताळणीसाठी करू शकतात.
2- यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून एम–आधार हे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.
3- या ठिकाणी तुम्हाला आधार पडताळणी करण्याकरिता दोन पर्याय दिले जातील व यातील पहिला पर्याय आधार पडताळणी असून या ठिकाणी तुम्ही आधार क्रमांक सह पडताळणी करू शकता.
4- दुसऱ्या पर्यायांमध्ये क्यूआर कोड स्कॅनर मध्ये आधार कार्ड दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून आधार क्रमांक बरोबर आहे की नाही हे तुम्हाला लागलीच कळते.
5- एवढेच नाहीतर तुम्ही आधार क्यूआर स्कॅनर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन करून आधारशी संबंधित योग्य माहिती घेऊ शकता.