सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा 500 ते 5000 रुपये जमा केल्यावर किती मिळतील पैसे? वाचा संपूर्ण कॅल्क्युलेटर

Published on -

सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारच्या माध्यमातून खास मुलींसाठी चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना असून या योजनेमध्ये गुंतवणूक करून मुलींचे भविष्य हे आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे शक्य आहे. जवळपास आज देशातील लाखो लोकांनी मुलींच्या नावाने या योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे.

या योजनेमध्ये तुम्हाला 250 रुपये प्रतिमहिना ते पाच हजार रुपये प्रतिमहिना पर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेच्या नियमानुसार मुलीच्या खात्यामध्ये वर्षाला 250 रुपये जमा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे व जास्तीत जास्त एक लाख 50 हजार रुपये तुम्ही एका वर्षात या योजनेत गुंतवू शकतात.

या योजनेअंतर्गत मुलीची वयाची दहा वर्ष पूर्ण होईपर्यंत खाते उघडता येऊ शकते. तसंच कुटुंबातील दोन मुलींचे खाते या योजनेत उघडता येऊ शकते. या योजनेत मुलीच्या नावाने केलेल्या गुंतवणुकीवर 8.2% दराने व्याज दिले जाते. तुम्हाला देखील तुमच्या मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडायचे असेल तर ते तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकतात.

याकरिता मुलीचे आधार कार्ड तसेच जन्माचा दाखला, मुलीच्या आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक आणि तुमचा रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रे लागतात.

 किती आहे या योजनेचा परिपक्वता कालावधी?

मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडलं तर तुम्हाला पंधरा वर्षे यामध्ये गुंतवणूक करावी लागते पंधरा वर्षानंतर मुलीला पैसे मिळतात. या योजनेचा कालावधी 21 वर्षाचा आहे व त्यानंतर परिपक्वता लाभ दिला जातो.

म्हणजे जास्तीच्या या सहा वर्षाच्या गुंतवणूकीनंतर तुम्हाला नफा मिळतो. तसेच जेव्हा मुलगी 18 वर्षाची होते तेव्हा तुम्ही या योजनेत गुंतवलेली जी काही रक्कम आहे तिच्या 50% रक्कम काढू शकतात.

 किती पैसे गुंतवल्यावर किती मिळेल परतावा?

1- प्रत्येक महिन्याला 250 रुपयांची गुंतवणूक जर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावे प्रत्येक महिन्याला 250 रुपयांची गुंतवणूक केली तर पंधरा वर्षात तुमचे 45 हजार रुपये जमा होतात व सरकार त्यावर 93 हजार 552 रुपये व्याज देते. म्हणजेच एकवीस वर्षानंतर मुलीला एकूण मॅच्युरिटी रक्कम 1 लाख 38 हजार 552 रुपये मिळते.

2- प्रत्येक महिन्याला 500 रुपये गुंतवणूक केली तर प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये गुंतवणूक केली तर या योजनेत पंधरा वर्षात तुमचे 90 हजार रुपये जमा होतात आणि या पैशावर तुम्हाला सरकारकडून एक लाख 87 हजार 103 रुपये व्याज दिले जाते. म्हणजेच योजनेच्या 21 वर्षानंतर तुमच्या मुलीला 2077,103 रुपये मिळतात.

3- प्रत्येक महिन्याला 1 हजार रुपये गुंतवले तर जर तुम्ही या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या नावावर प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये गुंतवणूक केली तर पंधरा वर्षात एकूण 1 लाख 80 हजार रुपये जमा होतात. या रकमेवर सरकारकडून तीन लाख 74 हजार दोनशे सहा रुपये व्याज मिळते. म्हणजेच 21 वर्षानंतर मुलीला मिळणारी एकूण मॅच्युरिटी रक्कम 5 लाख 54 हजार 206 रुपये इतकी मिळते.

4- प्रत्येक महिन्याला 2 हजार रुपये गुंतवले तर या योजनेचा मुलीच्या नावाने प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपयांची गुंतवणूक केली तर पंधरा वर्षात तीन लाख साठ हजार रुपये जमा होतात व 21 वर्षांनी व्याज आणि मुद्दल मिळवून 11 लाख 8 हजार 412 रुपये परतावा मिळतो.

5- प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये जमा केले तर या योजनेत जर मुलीच्या नावाने दर महिन्याला तीन हजार रुपये गुंतवले तर पंधरा वर्षात पाच लाख 40 हजार रुपये जमा होतात आणि यावर 11 लाख 22 हजार 619 रुपये पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून व्याज मिळते. 21 वर्षानंतर म्हणजेच या योजनेच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर मुलीला एकूण 16 लाख 62 हजार 619 रुपयाचा परतावा मिळतो.

6- प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर या योजनेतील मुलीच्या नावाने प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये गुंतवले तर पंधरा वर्षात नऊ लाख रुपये जमा होतात यावर व्याज म्हणून पोस्ट ऑफिस कडून 18 लाख 71 हजार 31 रुपये मिळतात. असे मिळून मुलीला या योजनेअंतर्गत 27 लाख 71 हजार 31 रुपयाचा फायदा मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe