Tractor Loan: एसबीआय आणि एचडीएफसी बँक देईल तुम्हाला ट्रॅक्टर लोन! वाचा कशा पद्धतीने देतात या बँका ट्रॅक्टर लोन आणि त्यांची वैशिष्ट्ये

Published on -

Tractor Loan:- ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांसाठी अत्यावश्य कसे यंत्र असून अगदी पेरणीपासून तर पिकांची काढणी केल्यानंतर वाहतूक करण्यापर्यंत अनेक कामांमध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची मदत होत असते. परंतु ट्रॅक्टरच्या किमती पाहिल्या तर द्या जास्त असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर देणे परवडत नाही.

त्यातल्या त्यात मिनी ट्रॅक्टरची किंमत देखील आर्थिक दृष्ट्या परवडेलच असे नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्जाचा आधार घेतला जातो. ट्रॅक्टर कर्ज म्हणजे ट्रॅक्टर लोन हे कृषी कर्ज श्रेणीमध्ये येते व देशातील अनेक आघाडीच्या बँका तसेच एनबीएफसी व सरकारी वित्तीय संस्था ट्रॅक्टर कर्ज देतात.

ट्रॅक्टर कर्जासाठी व्यक्तिगतरीत्या अर्ज करता येतो किंवा गटाने देखील अर्ज केला तरी चालते. या अनुषंगाने या लेखामध्ये आपण स्टेटबँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँकेच्या ट्रॅक्टर लोन विषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत.

 स्टेट बँक ऑफ इंडिया ट्रॅक्टर लोन

स्टेट बँक ऑफ इंडिया ही शेतकरी आणि कृषी किंवा व्यावसायिक कारणांकरिता ट्रॅक्टर खरेदी करू उच्चणाऱ्या व्यक्तींना ट्रॅक्टर कर्ज देते. ज्या व्यक्तीकडे किमान दोन एकर जमीन आहे अशा कोणालाही स्टेट बँकेच्या माध्यमातून ट्रॅक्टर लोन दिले जाते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ट्रॅक्टर लोनचा व्याजदर हा 9% पासून सुरु होतो.

 काय आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ट्रॅक्टर लोनची वैशिष्ट्ये

1- एसबीआय ट्रॅक्टर लोनसाठी पात्र होण्याकरिता कर्जदाराचे नियमित उत्पन्न असणे आवश्यक आहे आणि 15 टक्के मार्जिन आवश्यक आहे.

2- एवढेच नाही तर कर्जदाराने कर्जानंतर ट्रॅक्टर ॲक्सेसरीज साठी विमा घेणेदेखील आवश्यक आहे.

3- तसेच कर्जाच्या रकमेवर कर्जदार 0.5% आगाऊ शुल्क वापरतो.

 एचडीएफसी ट्रॅक्टर लोन

एचडीएफसी बँक शेतकरी आणि बिगर शेतकरी यांना ट्रॅक्टर खरेदीचा उपलब्ध करून देते. जरी वापरलेला किंवा नवीन ट्रॅक्टर घ्यायचा असेल तरी बँकेच्या माध्यमातून कर्ज दिले जाते. एचडीएफसी बँक ही आकर्षक व्याजदर आणि जलद कर्ज मंजुरी देते. एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून तीस मिनिटात कर्ज मंजूर केले जाते. तसेच जास्तीत जास्त कागदपत्रांची आवश्यकता यामध्ये भासत नाही.

 एचडीएफसी बँक ट्रॅक्टर लोनची वैशिष्ट्ये

1- एचडीएफसी बँकेच्या कर्जाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्जदारांना ट्रॅक्टर किमतीच्या 90% पर्यंत कर्ज मिळते.

2- अर्जदार पोस्ट डेटेड चेक, एसआय किंवा इसीएस या माध्यमातून कर्जाची परतफेड सोयीस्करपणे करू शकता.

3- एचडीएफसी बँकेतून अर्जदारांना अतिशय लवचिक पद्धतीने कर्ज प्रदान केले जाते. तारण जमा करावे लागते किंवा तारणाशिवाय देखील ट्रॅक्टर कर्ज मिळू शकते.

4- एचडीएफसी बँक ट्रॅक्टर लोनसाठी पात्र होण्याकरिता अर्जदाराचे किमान वय 18 असणे आवश्यक आहे.

5- एचडीएफसी बँक कर्जाच्या रकमेच्या दोन टक्के प्रक्रिया शुल्क करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe