EPFO Update: आता पीएफ खात्यातून ‘या’ कामासाठी नाही मिळणार पैसे! ईपीएफओने केली ही सुविधा बंद

Ajay Patil
Published:
epfo update

 

EPFO Update:- सरकारी आणि रजिस्टर कंपन्यांचे जे काही कर्मचारी असतात त्यांच्या दर महिन्याच्या पगारातून काही रक्कम ही पीएफ खात्यामध्ये जमा होत असते. परंतु ही जमा झालेली रक्कम निवृत्तीनंतर संबंधित कर्मचाऱ्यांना मिळत असते. परंतु या पीएफ खात्यातून कर्मचाऱ्यांना काही कामांकरिता आगाऊ पैसे काढण्याची सुविधा देखील देण्यात येते. याच प्रकारची पैसे काढण्याची सुविधा ही कोविड-19 ऍडव्हान्स नावाच्या रूपाने सुरू करण्यात आलेली होती.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने कोरोनाच्या पहिल्या लाटेत मार्च 2020 मध्ये प्रथमच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत आगाऊ पैसे काढण्याचे सुविधा दिली होती. या अंतर्गत कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यात जमा केलेल्या मूळ पगार आणि महागाई भत्त्याच्या 75% किंवा त्याच्या पीएफ खात्यामध्ये जे काही रक्कम शिल्लक आहे

त्याच्या 75 टक्के पर्यंत रक्कम काढू शकत होते. परंतु आता ईपीएफओने याबाबत परिपत्रक जारी केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, कोविड 19 ही महामारी आता नसल्यामुळे आगाऊ पैसे देण्याची ही सुविधा त्वरित प्रभावाने बंद करण्याचा निर्णय एपीएफओने घेतला आहे व हा आदेश सूट दिलेल्या ट्रस्टसह सर्वांना लागू असणार आहे.

 या कामांसाठी पीएफ खात्यातून काढता येते आगाऊ रक्कम

1- एखाद्यातून कर्मचाऱ्यांना घराच्या बांधकामासाठी, बांधकाम आणि दुरुस्तीकरिता प्लॉट खरेदीसाठी

2- होम लोनचा हप्ता फेडण्याकरिता

3- जर तुम्ही दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार असाल तर

4- जर कंपनीचे पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी करिता बंद असेल तर

5- नैसर्गिक आपत्तीमुळे जर घर किंवा मालमत्तेचे नुकसान झाले तर

6- कर्मचारी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला मोठा आजार असल्यास

7- कर्मचाऱ्याचे स्वतःचे लग्न किंवा त्याच्या मुलांचे शिक्षण आणि मुलांच्या लग्न करिता देखील पैसे काढता येतात.

 पीएफ खात्यातून इमर्जन्सीमध्ये किती आगाऊ रक्कम काढता येते?

पीएफ खात्यातील कर्मचाऱ्यांचे 75 टक्के पेक्षा जास्त योगदान निधी अग्रीम म्हणून मिळत नाही. एखादा कर्मचारी त्याच्या मागील तीन महिन्यांच्या पगारापेक्षा जास्त रक्कम ऍडव्हान्स फंड म्हणून काढू शकत नाही.

 नोकरी सोडल्यानंतर एक महिन्यानंतर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील किती पैसे काढू शकाल?

जर आपण पीएफ काढण्याचा नियम पाहिला तर त्यानुसार एखाद्या सदस्याची नोकरी गेली तर तो एक महिन्यानंतर त्याच्या पीएफ खात्यातून 75 टक्के पैसे काढू शकतो. तसेच खात्यात असलेली उर्वरित 25 टक्के रक्कम नोकरी सोडल्यानंतर दोन महिन्यांनी काढता येते.