Tips For Become Crorepati: ट्रिपल  15 चा फॉर्मुला करेल चमत्कार! वयाच्या 30व्या वर्षीही गुंतवणूक सुरू केली तरी बनवू शकतात तुम्ही करोडपती

Ajay Patil
Published:
become crorpati tips

Tips For Become Crorepati:- पैसे कमवा आणि या कमावलेल्या पैशांची बचत करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करा ही गोष्ट भविष्यकालीन आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्ही पैसे कमावले आणि मात्र जर त्यांची बचत करून गुंतवणूक केली नाही तर सगळे व्यर्थ जाते.

तसेच दुसरी गोष्ट म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी योग्य पद्धतीने प्लॅन निवडणे किंवा योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे देखील तितकेच गरजेचे असते. जर तुम्ही परफेक्ट प्लॅनिंग करून व्यवस्थित पद्धतीने गुंतवणूक केली तर आयुष्याच्या अगदी कमी वयामध्ये देखील तुम्ही लखपती होऊ शकतात.

समजा तुमचे वय तीस वर्ष असेल आणि तुम्हाला 45 व्या वर्षी लखपती व्हायचे असेल तर त्यासाठी ट्रिपल 15 म्हणजे 15×15×15 चा फॉर्मुला वापरू शकतात.

 काय आहे हा फॉर्म्युला?

 पैसे बरेच जण कमावतात परंतु बरेच जण श्रीमंत होतात असे आपल्याला दिसून येत नाही. परंतु आता गुंतवणुकीच्या बाबतीत बरेच जण सजग झाले असल्यामुळे गुंतवणुकीला खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व प्राप्त झालेले आहे व ती गरज देखील आहे.

समजा तुमचे वय आता वीस वर्ष असेल व तुम्हाला गुंतवणुकीचे महत्त्व कळले असेल तरीदेखील तुम्ही या वयात गुंतवणूक सुरू करून लखपती होऊ शकतात. याकरिता तुम्हाला परफेक्ट नियोजन करणे गरजेचे आहे व फक्त पुढचे पंधरा वर्षे व्यवस्थित पद्धतीने पैशांची बचत करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही 15×15×15 हे सूत्र वापरणे गरजेचे आहे.

या पद्धतीने जर तुम्ही गुंतवणूक केली तर पंधरा वर्षांमध्ये तुम्ही एक कोटी रुपये उभे करू शकतात व तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकतात. हे सूत्र जे आहे ते म्युच्युअल फंडाशी जोडून जर पाहिले तर त्याचे महत्त्व आपल्याला पटते. बरेच आर्थिक सल्लागार देखील आपल्याला म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी करण्याचा सल्ला देत असतात.

कारण यामध्ये गुंतवणूक करणे सोपे आहेच परंतु परतावा देखील चांगला मिळतो. कारण यामध्ये कंपाऊंडिंगची ताकद असल्याने परतावा जास्त मिळत असतो. ट्रिपल 15 च्या फार्मूला अंतर्गत पहिला 15 चा विचार केला तर ते गुंतवणुकीची रक्कम आहे.

म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. दुसरा पंधराचा अर्थ पाहिला तर ते आहे गुंतवणुकीचे वर्ष. जर तुम्हाला पंधरा वर्षे महिन्याला पंधरा हजार रुपये याप्रमाणे गुंतवणूक करावी लागेल व तिसरा पंधराचा अर्थ आहे तो म्हणजे तुम्हाला या गुंतवणुकीवर वार्षिक पंधरा टक्के व्याज मिळणे गरजेचे राहील.

 महिन्याला पंधरा हजार रुपये पंधरा वर्षासाठी गुंतवून कसे होता येते करोडपती?

 यामध्ये तुम्हाला पंधरा वर्षाकरिता म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये प्रत्येक वेळेला पंधरा हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर आपण एसआयपी चा  दीर्घ मुद्दतीत केलेल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्याचा विचार केला तर तो 15 ते 18% पर्यंत मिळाला आहे अशी सद्यस्थिती आहे.

आपण अंदाजे पकडले की 15% दराने जर तुम्हाला गुंतवणुकीवर व्याज मिळाले तर पंधरा वर्षात तुमचे 27 लाख रुपये जमा होतात व त्यावर 15% दराने जर व्याज मिळाले तर व्याजाची रक्कम ही 74 लाख 52 हजार 946 रुपये होते. याचाच अर्थ तुमचा एकूण फंड हा एक कोटी एक लाख 52 हजार 946 रुपये इतका जमा होतो.

( टीप कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करण्या अगोदर तुमच्या गुंतवणूक तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe