EPFO Update:- पेटीएम वर नुकतीच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये रिझर्व बँकेने पेटीएम विरुद्ध काही आदेश दिले असून आदेशानुसार 29 फेब्रुवारी नंतर पेटीएम पेमेंट बँक खात्यात पैसे जमा करता येणार नाहीत.
तसेच पेटीएम पेमेंट बँकेच्या माध्यमातून वॉलेट, प्रीपेड सेवा तसेच फास्टटॅग आणि इतर सेवांमध्ये पैसे जमा करता येणे आता शक्य होणार आहे. एवढेच नाही तर व्याज तसेच कॅशबॅक आणि परतावा खात्यामध्ये कधीही जमा केला जाऊ शकतो.
फक्त यामध्ये बँकेच्या ग्राहकांचे बचत व चालू खाते, प्रीपेड साधने, फास्टटॅग तसेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड इत्यादी मधून पैसे काढणे किंवा वापरणे यावर कुठलेही निर्बंध नाहीत. शिल्लक जोपर्यंत उपलब्ध होईल तोपर्यंत ते वापरता येते.
या सेवांव्यतिरिक्त पेटीएम बँकेला 29 फेब्रुवारी 2024 नंतर मात्र कोणतीही बँकिंग सेवा प्रदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही व विशेष म्हणजे यूपीआय सुविधा देखील 29 फेब्रुवारी नंतर दिली जाणार नाही.
अशाप्रकारे पेटीएम वर रिझर्व बँकेने निर्बंध घातले व या पाठोपाठ आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने देखील पेटीएमला मोठा झटका दिलेला आहे. यामध्ये ईपीएफओने पेटीएम पेमेंट सोबत जोडलेल्या पीएफ खात्यांना अपडेट करण्याच्या महत्त्वाच्या सूचना दिली आहेत.
ईपीएफओने दिल्या पेटीएम पेमेंट सोबत जोडलेल्या खात्यांना अपडेट करण्याच्या सूचना
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने पेटीएम पेमेंट बँकेसोबत जोडलेले जे खाते आहेत त्यांना अपडेट करण्याच्या सूचना दिल्या असून यामध्ये जर कोणत्याही खातेधारकाने दिलेल्या मुदतीपूर्वी त्यांच्या खाते अपडेट केले नाही तर यांच्या खात्यातून प्रत्येक महिन्याला कापली गेलेली रक्कम फेब्रुवारी नंतर थांबवण्यात येणार आहे.
म्हणजेच एकंदरीत पाहिले तर रिझर्व बँक ऑफ इंडिया नंतर ईपीएफोने देखील पेटीएम पेमेंट बँकेची जोडलेली आहे ईपीएफ खात्यांमध्ये व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे. यामध्ये पेटीएम पेमेंट बँक खात्यांशी जोडलेल्या सर्व ईपीएफ खात्यांमध्ये ठेव किंवा क्रेडिट व्यवहार थांबवण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे.
एवढेच नाहीतर ईपीएफओ च्या माध्यमातून 23 फेब्रुवारी 2024 पासून सर्व क्षेत्रीय कार्यालयांना पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड खात्यांशी जोडलेल्या ईपीएफ खात्यांमधील दावे निकाली काढण्यापासून रोखले आहे. त्यामुळे जर तुमचे देखील ईपीएफ खाते पेटीएम पेमेंट बँकेची जोडलेले असेल तर ते लवकरात लवकर अपडेट करणे गरजेचे आहे.
23 फेब्रुवारी 2024 पासून पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडशी जे काही बँक खाते आहेत त्या खात्यांवर दावे स्वीकारणे थांबवण्याचा सल्ला 8 फेब्रुवारी 2024 ला ईपीएफओच्या माध्यमातून सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेला आहे.
त्यामुळे तुमचे जर पीएफ खाते पेटीएम पेमेंट बँकेशी लिंक असेल तर तुम्हाला व्यवहार करता येणार नाही. तुम्ही ते लवकरात लवकर अपडेट करणे गरजेचे आहे.
साधारणपणे आरबीआयच्या आदेशानुसार ग्राहक 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत पैसे काढण्यासाठी आणि क्रेडिट मिळवण्याकरिता पेटीएम ॲप वापरू शकतात. परंतु या तारखेनंतर मात्र ग्राहकांना त्यांच्या या पेटीएम पेमेंट बँक खात्यात किंवा वॉलेटमध्ये पैसे जमा करता येणार नाहीत.