Recycle Business: 10 ते 15 हजार रुपयांपासून सुरू करा ‘हा’ व्यवसाय! दरमहा कमवू शकता लाखो रुपये

Ajay Patil
Published:
recycle business

Recycle Business:- बऱ्याच जणांच्या मनामध्ये एखादा व्यवसाय सुरू करावा अशी इच्छा असते. परंतु कुठलाही व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे त्यामध्ये आपल्याला गुंतवणुकीसाठी पैसा हा लागतो. परंतु बऱ्याचदा आपल्याकडे तो पैसा उपलब्ध नसतो व त्यामुळे छोट्या छोट्या गुंतवणुकीतून एखादा चांगला व्यवसाय करण्याकडे प्रत्येकाचा कल दिसून येतो.

जर आपण छोट्या गुंतवणुकीच्या स्वरूपातील व्यवसाय पाहिले तर ते अनेक प्रकारचे आहेत. अशाच प्रकारचा एक व्यवसाय आपण या लेखात बघणार असून तुम्ही अवघ्या दहा ते पंधरा हजार रुपये गुंतवणुकीतून करू शकता व त्या माध्यमातून लाखो रुपये कमवू शकतात.

 रीसायकल बिझनेस आयडिया

या व्यवसायाला आपण रिसायकलिंग व्यवसाय देखील म्हणू शकतो व या व्यवसायाला खूप मागणी आहे. जर आपण बरेच लोक पाहिले तर या व्यवसायातून अनेक जणांनी खूप चांगला पद्धतीने पैसा मिळवला आहे. रिसायकलिंग व्यवसायाची व्याप्ती खूप मोठी असून जगात दरवर्षी दोन अब्ज टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो व नुसता भारताचा विचार केला तर भारतात देखील 277 दशलक्ष टनापेक्षा अधिक कचरा तयार होतो.

एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तयार होणारे कचऱ्याचे व्यवस्थापन करणे खूप कठीण गोष्ट आहे. त्यामुळे अशा टाकाऊ वस्तूंपासून घर सजावटीच्या वस्तू तसेच पेंटिंग जो दागिने बनवून कचऱ्याची समस्या कमी करू शकता व त्याचे व्यवसायात रूपांतर करू शकतात. या पद्धतीच्या व्यवसायाला  भंगार व्यवसाय असे देखील म्हणू शकतो.

यासाठी तुम्हाला टाकाऊ वस्तू गोळा करावे लागतील व तुम्ही तुमच्या महानगरपालिका किंवा नगरपालिका हद्दीतून देखील कचरा उचलू शकतात व अनेक ग्राहकांच्या माध्यमातून देखील असे टाकाऊ कचरा स्वरूपात साहित्य दिले जाते ते देखील तुम्ही खरेदी करू शकतात.

 भंगार व्यवसायातून किती करता येईल कमाई?

अशा पद्धतीचे टाकाऊ पदार्थ किंवा कचऱ्यापासून तुम्ही अनेक फायद्याच्या आणि वापराच्या गोष्टी बनवू शकतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर या माध्यमातून तुम्ही टायरचा वापर केला तर त्यापासून तुम्ही खुर्ची बनवू शकतात. परंतु ॲमेझॉन वर अशा खुर्चीची किंमत सातशे रुपये इतके आहे.तसेच वुडन क्राफ्ट, किटली तसेच काच,

कंगवा आणि इतर सजावटीच्या वस्तू देखील बनवता येणे शक्य आहे. त्यानंतर तुम्ही मार्केटिंग परफेक्ट केले तर हा व्यवसाय तुम्हाला खूप चांगला पैसा मिळवून देऊ शकतो. अशा व्यवसायाच्या माध्यमातून तयार वस्तू तुम्ही ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देखील विकू शकतात. तसेच ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर देखील याची विक्री करता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe