Reliance Industry: अनंत,आकाश आणि ईशा अंबानी यांना किती आहे पगार? कुठल्या पार पाडतात जबाबदाऱ्या? वाचा माहिती

Ajay Patil
Published:

Reliance Industry:- रिलायन्स इंडस्ट्री म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर पटकन येते ते अंबानी कुटुंब होय. भारतातील प्रसिद्ध उद्योग समूह आणि त्यासोबत जागतिक पातळीवरील उद्योग जगतातील एक प्रसिद्ध नाव आणि उद्योग समूह म्हणून  रिलायन्स इंडस्ट्रीज कडे पाहिले जाते. अनेक प्रकारच्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये या उद्योग समूहाने खूप मोठे वर्चस्व प्रस्थापित केले असून या अंबानी किंवा रिलायन्स ग्रुपचे सर्वेसर्वा धीरूभाई अंबानी नंतर त्यांचे सुपुत्र मुकेश अंबानी आणि आता त्यांच्यानंतर त्यांची तिसरी पिढी म्हणजेच अनंत तसेच आकाश व ईशा अंबानी हे आता उद्योग व्यवसायांचा पसारा सांभाळण्यासाठी सज्ज झाली आहेत.

शेअर मार्केटमध्ये देखील रिलायन्स इंडस्ट्रीजचा दबदबा असून शेअर मार्केटमध्ये या इंडस्ट्रीजचे सहा अब्ज 76 कोटी 57 लाख 88 हजार 990 शेअर्स आहेत. यातील तीन अब्ज 32 कोटी 27 लाख 48 हजार 48 शेयर हे अंबानी कुटुंबीय आणि त्यांचे प्रमोटर्स यांच्याकडे आहेत. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी असून ते आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत.

जागतिक पातळीवरील अब्जाधीशांच्या यादीमध्ये ते 12 व्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 91.7 अब्ज डॉलर इतकी आहे. मुकेश अंबानी यांचे तीनही मुलं देखील आता वेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत असून त्यांना नेमकी किती पगार मिळते त्याबद्दल देखील आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे. याचीच महत्त्वाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 आकाश अंबानीची किती आहे कमाई?

सध्या टेलिकॉम सेक्टरची जबाबदारी आकाश अंबानी यांच्याकडे असून सन 2022 पासून आकाश अंबानी हे रिलायन्स टेलिकॉम युनिटचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिओनी आता खूप मोठी आघाडी घेतली असून त्यांच्याच प्रयत्नातून ऑप्टिकल केबलच्या माध्यमातून वेगवान इंटरनेटची योजना आता संपूर्ण भारतभर सुरू करण्यात येणार आहे.

याकरिता अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. जर आपण आकाश कमाई किंवा आर्थिक मिळकत पाहिली तर आकाश याला बैठकीचा खर्च आणि नफ्याच्या माध्यमातून कमिशन देण्यात येते. तसेच आकाश अंबानी यांना मिळणारे रिलायन्स बोर्ड पॅकेज हे त्यांच्या आई नीता अंबानी इतकेच आहे.

 ईशा अंबानीची किती आहे मिळकत?

ईशा अंबानी या मुकेश अंबानी यांच्या कन्या असून त्यांच्याकडे रिलायन्स रिटेल व्हेंचर ची जबाबदारी आहे. त्यांच्या या रिटेल कंपनीच्या माध्यमातून जगातील या क्षेत्रातील अनेक ब्रँड एकत्र झालेले आहेत. ही कंपनी महसुलामध्ये आणि मिळणाऱ्या नफ्यात देखील अग्रेसर व प्रसिद्ध आहे. जर आपण काही मीडिया रिपोर्टचा विचार केला तर रिलायन्स रिटेलचा आठ हजार 361 कोटींचा व्यवसाय किंवा  डोलारा आहे.

ईशा अंबानी यादेखील आकाश अंबानी यांच्याप्रमाणे पगार घेत नाहीत. रिलायन्स मंडळाचे जे काही नियम आहे त्यानुसार मानधन आणि लाभांश अंबानी यांना मिळतो. परंतु शेअर आणि बोनस शेअर व लाभांश यांच्या माध्यमातून ईशा अंबानी यांना मोठे आर्थिक उत्पन्न मिळते.

 अनंत अंबानी यांना किती मिळते आर्थिक उत्पन्न?

मुकेश अंबानी यांचे सर्वात लहान सुपुत्र अनंत अंबानी असून ते जिओ प्लॅटफॉर्म तसेच रिलायन्स रिटेलच्या संचालकांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे नव्याने अक्षय ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांची जबाबदारी देखील देण्यात आलेली आहे. अनंत अंबानी यांनी राधिका मर्चंट त्यांच्यासोबत लग्न केले आहे.

मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तीनही मुलांना ऑगस्ट महिन्यात संचालक मंडळावर घेण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार त्यांची ही तिघही मुलं आता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळात आहे. अनंतला मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा विचार केला तर  रिलायन्स व्यवस्थापकीय मंडळाचे जे काही नियम आहेत त्यानुसार त्याला अनुषंगिक लाभ देण्यात येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe