लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा उन्हाळ्यामुळे लिंबाचे भाव वाढले

Ahmednagarlive24 office
Published:

मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे बाजारातील भाजीपाल्याची आवक देखील कमी झाली आहे. यंदा मान्सूनच्या पावसाने ऐनवेळी दगा दिल्याने इतर पिकांसोबतच भाजीपाल्याची देखील लागवड कमी प्रमाणात झाली होती.

परिणामी उत्पादनात मोठी तूट आली आहे. त्यातच परत आक्टोबर नोव्हेंबरमध्ये अवकाळीचा फटका बसला. त्यात देखील मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटात फळबागांना देखील चांगलाच फटका बसला असून अनेक ठिकाणी फळ गळती झाली तर अनेक भागात कमी प्रमाणात बहार आल्याने उत्पादनात घट आली आहे.

त्यामुळे उन्हाळ्याची चाहुल लागताच लिंबाला चांगले दर मिळत आहेत. मात्र दुसरीकडे कांद्याने मात्र पर शेतकऱ्यांची निराशाच केली आहे. निर्यात बंदी मागे घेतल्याच्या चर्चेमुळे रातोरात २५००रूपयांवर गेलेला कांदा परत कोसळला आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा लसणाचे उत्पादन कमी झाले असून अद्याप नवीन लसूण बाजारात येण्यास कालावधी लागणार आहे. त्यामुळे बाजारात लसणाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने लसणाचे दर चांगलेच वाढलेले आहेत.

त्यापाठोपाठ गवारी, हिरव्या मिरच्या सोबतच हिरव्या पालेभाज्यांचे देखील दर वाढले आहेत. परंतु एकीकडे शहरातील नागरिकांना शेतमाल महागड्या दरात खरेदी करावा लागत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातात मात्र अत्यंत कमी पैसे मिळत आहेत.

त्यामुळे दर वाढून देखील शेतकरी उपाशीच असल्याचे चित्र आहे. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर : टोमॅटो ५०० – २०००, वांगी १००० – ३५००, फ्लावर १००० – २५००, कोबी १००० – ३०००, काकडी ३०० – १५००, गवार ८००० – १५०००, घोसाळे २००० – ३०००, दोडका २५०० – ५५०००, कारले २५०० – ५०००, भेंडी २५०० – ४०००, वाल १५०० – ३०००, घेवडा २००० -३५००, तोंडुळे २००० – ३०००, डिंगरी २००० – ३०००, बटाटे ८०० – १७००, लसूण ६००० – २०,०००, हिरवी मिरची २५०० – ६०००, आवळा ४००० – ४०००, शेवगा १५०० – ४०००, लिंबू ३५०० – १०,०००, आद्रक ३५०० – ७०००, दु.भोपळा ५०० – १२००, शिमला मिरची १००० – ४१००, मेथी ८०० – १४००, कोथिंबीर ९०० – १५००, पालक १००० – १२००, मुळे १००० – २०००, कांदा पात ८०० – १०००, वाटाणा ३००० – ५०००.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe