Financial Planning : राकेश झुनझुनवाला व वॉरन बॅफे यांनी पैशाबद्दल सांगितलेल्या ह्या सात गोष्टी लक्षात ठेवा ! कधीच नाही येणार अडचण

Published on -

Financial Planning :- बऱ्याचदा आपण व्यवसाय किंवा नोकरीच्या माध्यमातून भरपूर पैसा कमावतो. परंतु हा कमावलेला पैसा आपल्या हातात टिकतच नाही किंवा आपल्याला पैशांची बचत करता येत नाही.

त्यामुळे भविष्यामध्ये जर काही आर्थिक संकट उद्भवले तर आपल्या हातात पैसा नसतो व आपल्याला मोठ्या समस्येला तोंड द्यायला लागते. त्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये आर्थिक तरतूद करून ठेवणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच त्याला आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे असे देखील म्हणतो. आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होणे म्हणजे नेमकं काय?

याचा जर विचार आपण केला तर समजा तुम्ही नोकरी किंवा एखादा व्यवसाय करत आहात व काही कारणामुळे नोकरीतील पगार झालाच नाही किंवा पगार कमी झाला तरी देखील त्या कालावधीमध्ये तुम्हाला लागेल तेवढा पैसा तुमच्याकडे आहे त्यालाच आपण आर्थिक स्वावलंबन म्हणू शकतो.

व्यवसायाच्या बाबतीत जर तुमच्या व्यवसायावर काही वाईट वेळ आली किंवा तोटा आला तरी त्याचा तुमच्या जीवनशैलीवर फार मोठा परिणाम होणार नाही इतके पैसे तुमच्याकडे असणे म्हणजेच आर्थिक स्वावलंबन होय.

त्यामुळे तुम्ही कमवत असलेला जो काही पैसा आहे त्याची नियोजन तुम्ही कसे करत आहात? या गोष्टीला खूप महत्त्व आहे. या अनुषंगाने आपण आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने महत्त्वाचे व आर्थिक नियोजनासाठी आवश्यक काही बाबी पाहणार आहोत.

आर्थिक नियोजनाची सूत्रे

याबाबतीत प्रसिद्ध शेअर मार्केट गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला व वॉरन बॅफे यांनी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत त्या आपण बघू…..

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचा आयुर्विमा आणि आरोग्य विमा असणे खूप गरजेचे आहे.

2- गुंतवणूक ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे व त्या दृष्टिकोनातून गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

3- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शक्य तितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात करणे गरजेचे आहे. जर तुम्ही वयाच्या तीस वर्षाच्या आतमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्ही साधारणपणे 45 वर्षापर्यंत आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याची शक्यता खूप जास्त असते.

4- तुमचे बँकेतील जे काही बचत खात असेल त्याचा वापर दर महिन्याच्या खर्चासाठी करणे गरजेचे नाही. तुमचे बचत खाते स्वतंत्र ठेवावे आणि वेगळ्या खात्यातून लागणारा खर्च करावा.

5- वयाच्या एका टप्प्यानंतर आयुष्यामध्ये मुलांची शिक्षण तसेच वाढत्या वयामध्ये येणाऱ्या आरोग्यविषयक समस्या इत्यादी गोष्टी उद्भवतात. या दृष्टिकोनातून तुम्ही आयुष्यात आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.

6- तुमचा सध्याचा जो काही खर्च आहे त्यासोबत तुम्ही भविष्यकाळातील खर्चाचा देखील विचार करून त्यानुसार योजना बनवणे गरजेचे आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर पुढच्या पाच वर्षांनी तुमच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च किती असू शकतो याचा एक अंदाज घेऊन त्यानुसार तुम्ही पाच वर्षाचे नियोजन करून आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे.

7- भविष्यामध्ये येणारा प्रत्येक खर्च डोळ्यासमोर ठेवून तुम्ही गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही गुंतवणूक करत आहात परंतु तुम्हाला जेव्हा पैशांची गरज भासेल त्या कालावधीपर्यंत तुमची गुंतवणूक परिपक्व होईल याची देखील खातरजमा करणे गरजेचे आहे. तसेच भविष्याकरिता तुम्ही पैशांची तरतूद करण्यासाठी किती पैसा गुंतवत आहात आणि किती कालावधीसाठी गुंतवतात हे देखील पाहणे महत्वाचे आहे.

इत्यादी छोट्या परंतु महत्त्वाचे सूत्र जर तुम्ही अवलंबली तर तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतात हे मात्र निश्चित.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News