अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवीन प्लॅन बाजारात आणत आहेत. लॉकडाउनच्या काळात इंटरनेटचा वाढता वापर पाहता अनेक नवनवीन स्कीम अनेक कंपन्यांनी बाजारात आणल्या आहेत.
नवीन ग्राहकांना आकर्षित करणे आणि त्यांना तसा बेनिफिट देणे हे लक्ष्य आणि उद्दीष्ट ठेऊन अनेक कंपन्या आपले प्लॅन्स आणत आहेत.
आता टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडिया(VI) आपल्या ऑनलाइन सिम कार्ड डिलिव्हरी सेवेचा विस्तार करत आहे. यासाठी कंपनीने एक नवीन 399 रुपयांचा डिजिटल एक्सक्लुझिव्ह प्रिपेड प्लॅन आणला आहे.
जे ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवरुन ऑनलाइन सिम कार्ड ऑर्डर करतील त्यांच्यासाठी कंपनीने हा प्लॅन आणला आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत हा प्लॅन स्वस्त आहे.
व्होडाफोन आयडियाच्या डिजिटल एक्सक्लुझिव्हचे फायदे :- 399 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 56 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह दररोज 1.5GB डेटा मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतिदिन 100SMS ची सुविधाही आहे. तसंच, या प्लॅनमध्ये युजर्स Vi movies आणि TV चा अॅक्सेसही मिळेल.
हा रिचार्ज प्लॅन Vi च्या सध्याच्या ग्राहकांसाठी ऑनलाइन उपलब्ध आहे. मात्र नवीन ग्राहकांना या प्लॅनचा फायदा ऑनलाइन सिम कार्ड खरेदी केल्यासच मिळेल. त्यामुळे कंपनीने याला ‘डिजिटल एक्सक्लुझिव्ह’ प्लॅन म्हटलं आहे. Vi ने नवीन रिचार्ज प्लॅन ‘फर्स्ट रिचार्ज’ प्लॅनअंतर्गत आणले आहेत.
यामध्ये 97 रुपये, 197 रुपये, 297 रुपये, 497 रुपये आणि 647 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचा समावेश आहे. तर, 399 रुपयांचा एफआरसी प्लॅन ऑनलाइन ग्राहकांसाठी आहे.
399 रुपयांच्या एफआरसी प्लॅनशिवाय कंपनीने 299 रुपयांचा एफआरसी प्लॅनही आणला आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा मिळेल.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com