Success Story: ऋतुराजचा अनोखा आहे शेतीचा प्रयोग! शेतीला दिले स्टार्टअपचे स्वरूप आणि कमवत आहे करोडोचा नफा

Ajay Patil
Published:
ruturaj sharma

Success Story:- आजकालची तरुणाई हा कल्पनांचा अथांग सागर असून तरुणांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना कायम डोक्यामध्ये घोंगावत असतात. यातील बरेच कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी अनेक तरुण धडपडतात व कल्पना सत्यात उतरवतात देखील व यशस्वी देखील करून दाखवतात.

तसेच सध्याचा कालावधी हा नोकऱ्यांच्या मानाने प्रतिकूल असून नोकऱ्यांची उपलब्धता खूप कमी असल्याने अनेक तरुण आता वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळत आहेत व अनेक तरुण शेती व्यवसायाकडे देखील वळताना दिसून येत आहेत.

यामध्ये व्यवसायिक दृष्टिकोनातून शेती करण्याच्या उद्देशाने तरुण वेगवेगळे प्रयोग शेतीत करताना आपल्याला दिसून येतात. याच प्रकारचा प्रयोग राजस्थान मधील एका 33 वर्षीय तरुणाने केला असून त्या तरुणाचे  नाव आहे ऋतुराज शर्मा हे होय.

त्याने नोकरी सोडली व शेतीमध्ये स्टार्टअप सुरू केला. त्यांनी खूप अनोख्या पद्धतीने शेती करायला सुरुवात केली असून शेतीशी संबंधित झेटाफार्मस नावाची कंपनी त्याने उभारली आहे. याच ऋतुराजची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 ऋतुराज शर्माने उभारली झेटाफार्मस कंपनी

राजस्थान मधील गुडगाव येथे राहणाऱ्या ऋतुराज शर्मा या तरुणाची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर त्याने बीटेक आणि एमबीए केले असून उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नोकरी करण्याऐवजी झेटाफार्म नावाची कंपनी उभारली.

या कंपनीच्या माध्यमातून तो भाडेतत्त्वावर जमीन घेतो व त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फळे आणि भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. या सगळ्या शेतीच्या मॉडेल मधून तो करोडो रुपयांचा नफा मिळवत आहे. सध्या ही कंपनी मोठ्या प्रमाणावर भाडेतत्त्वावर किंवा करारावर शेती करत असून एका व्यक्तीकडून कमीत कमी 50 एकर व गटांकडून जास्तीत जास्त 100 एकर जमीन घेतली जाते

व या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला व फळ पिके पिकवली जातात. सध्या या कंपनीचा विस्तार 15 राज्यांमध्ये झाला असून जवळपास 20 हजार एकर जमिनीवर शेती करत आहेत. सगळ्या क्षेत्रावर एकूण 60 प्रकारचे पिके ऋतुराज घेतो.

भाजीपाला व फळ पिकांसोबतच गहू तसेच हरभरा,चहा, कॉफीचे मळे असं सर्व प्रकारची शेती या माध्यमातून केली जाते. तीन वर्षे शेती करून त्याने बाराशे कोटींची कंपनी उभारलेली आहे. ऋतूराजने उभारलेली झेटाफार्मस ही कंपनीच्या टीममध्ये ऑपरेशन तसेच मॅनेजमेंट, मार्केटिंग,

फायनान्स मधील तज्ञांचा समावेश करण्यात आलेला असून शेतीच्या करिता नवीन तंत्रज्ञानाचा वापर ते करतात. तसेच पिकांसाठी औषधे,खते व कीटकनाशकांचा वापर व त्यांचे व्यवस्थापनाच्या पद्धती देखील हाताळण्याचे काम या कंपनीच्या माध्यमातून केले जाते.

या कंपनीच्या माध्यमातून पिकांना गरजेनुसार सिंचन तंत्रज्ञानाचा वापर देखील केला जातो. जर काही ठिकाणी शेतीसाठी पाण्याची कमतरता असेल तर कमीत कमी पाण्यात पीक घेण्याचे नियोजन केले जाते व उत्पादन घेतले जाते.

 ऋतुराजने कशी केली या व्यवसायाची सुरुवात?

सुरुवातीला दोन एकर शेती भाडेतत्त्वावर घेऊन त्याने या व्यवसायाला सुरुवात केली व हळूहळू अशा प्रकारच्या करारावर किंवा भाडेतत्त्वावर जमीन घेऊन व्यवसाय वाढीस लावला. पहिल्याच वर्षी ऋतूराजच्या कंपनीला एक लाख रुपयांचा नफा झाला व त्यानंतर त्याला प्रोत्साहन मिळून त्याने झपाट्याने काम वाढवले.

एका ठिकाणी किंवा एकाच पिकाची शेती ही नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे ऋतू राजची झेटाफार्मस कंपनी पिकांच्या विविधतेवर मोठ्या प्रमाणावर काम करते व वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते. आज ऋतुराज शर्मा हा या कंपनीच्या जोरावर कोटी रुपये कमवत आहे व झेटा फार्मस या कंपनीचे मूल्य करोडो रुपयात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe