Salary Hike 2023 :- केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकासाठी सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे महागाई भत्ता, घर भाडेभत्ता आणि वेतन आयोग हे आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा सरळ परिणाम हा कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीवर होत असतो. सध्या अनेक ठिकाणी चर्चा पाहिली तर घरभाडे भत्ता आणि महागाई भत्त्यात वाढ होण्याची दाट शक्यता असल्यामुळे याचा लवकरच फायदा कर्मचाऱ्यांना होण्याची शक्यता आहे व सरकारच्या माध्यमातून देखील त्याची घोषणा केली जाऊ शकते अशी देखील माहिती समोर आली आहे.
जर आपण महागाई भत्त्याचा विचार केला तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि निवृत्तीवेतनधारकाचा महागाई भत्ता व घर भाडेभत्ता यामध्ये वर्षातून दोनदा सुधारणा केली जाते. याच अनुषंगाने विचार केला तर महागाई भत्तातील पहिली वाढ जानेवारीत आणि दुसरी जुलैमध्ये केली जात असते.
यामध्ये जानेवारी ते जून महिन्यापर्यंतचे दर निश्चित झाले असून जुलै ते डिसेंबर पर्यंतचे दर जारी करायचे आहेत. महत्वाचे म्हणजे घर भाडे भत्ता आणि महागाई भत्ता यांच्यातील वाढ ही सातव्या वेतन आयोगाच्या आधारे केली जाते. आपल्याला माहित आहेच की एआयसीपीआय निर्देशकाच्या आकडेवारीनुसार महागाई भत्त्याचा दर निर्धारित केला जातो. त्यामुळे सध्याच्या आकडेवारीवरून नुसार विचार केला तर महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ होणार असून आताच्या 42 टक्क्यांवरून तो 45 टक्के होण्याची अपेक्षा आहे.
महागाई भत्त्यात होणार तीन टक्क्यांची वाढ
जर आपण मीडिया रिपोर्टचा विचार केला तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 45 टक्के महागाई भत्त्याचा लाभ लवकरात लवकर मिळण्याची शक्यता असून सध्या मिळणाऱ्या 42 टक्क्यांवरून ही वाढ 45 टक्क्यांपर्यंत होईल. याचा लाभ देशातील 47.58 लाख कर्मचारी आणि 69.76 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. सप्टेंबरमध्ये मोदी सरकार यावर निर्णय घेण्याची शक्यता असून लवकरच कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
महागाई भत्त्यात वाढ झाल्यास पगारात किती होईल वाढ?
समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचे जर बेसिक वेतन हे 18000 रुपये असेल तर 45% महागाई भत्यानुसार यात वाढ होईल. म्हणजेच 18000 रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्याला बेचाळीस टक्के या दराने 7560 रुपये महागाई भत्ता मिळतो आणि जेव्हा तो 42% वरून 46% होईल तेव्हा प्रत्येक महिन्याला 8280 रुपये महागाई भत्ता मिळेल.
समजा एखाद्याचा पगार जर 30 हजार रुपये असेल तर त्याला डिआर म्हणून 44 हजार 400 रुपये मिळतील व चार टक्के डीआर वाढल्यानंतर हे पैसे 42 हजार 600 रुपये पर्यंत वाढतील. पेंन्शनचा विचार केला तर यामध्ये या आकडेवारीनुसार प्रत्येक महिन्याला आठशे रुपयांची वाढ होणार आहे.