भविष्यासाठी गुंतवणूक ही खूप महत्त्वाची असते. तुम्हाला जर तुमचे भविष्यकालीन जीवन आर्थिकदृष्ट्या समृद्ध असे जगायचे असेल तर तुम्ही जे काही पैसे कमवता त्यातून बचत करून तुम्ही त्या बचतीचे एखाद्या चांगल्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते.गुंतवणूकदारांकडून ज्याप्रमाणे बँक आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांना गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले जाते
अगदी त्याचप्रमाणे भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या अनेक योजनांना देखील तितकेच महत्त्व आहे व त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते.
एलआयसीच्या गुंतवणूक योजनांचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मधून तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून चांगला परतावा मिळवता येणे शक्य आहे व त्यासोबतच तुम्हाला विम्याचे संरक्षण देखील प्राप्त होते. एलआयसीचे अनेक असे उत्कृष्ट गुंतवणूक प्लॅन आहेत व त्यातीलच एका महत्त्वाच्या एका प्लॅनची माहिती या लेखात आपण बघणार आहोत.
एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी आहे फायद्याची
एलआयसीचे जीवन आनंद पॉलिसी खूप महत्त्वाची असून अनेक गुंतवणूकदार या पॉलिसीमध्ये किंवा या प्लान मध्ये गुंतवणूक करतात. या प्लॅनमध्ये तुम्ही तुमचा आर्थिक बजेटनुसार गुंतवणुकीला सुरुवात करू शकता
व दीर्घकालीन गुंतवणुकीत सातत्य ठेवून लाखो रुपयांचा निधी जमा करू शकतात. यामध्ये दररोज तुम्ही 45 रुपयांची बचत केली तरी देखील तुम्ही काही वर्षांनी 25 लाख रुपये मिळवू शकतात. सध्या तुम्ही एका महिन्यासाठी प्रत्येक दिवसाला 45 रुपये वाचवले तर महिन्याला 1358 रुपये जमा होतात.
अशाप्रकारे तुम्ही दररोज 45 रुपयांची गुंतवणुकीचे टार्गेट ठेवले व पुढील 35 वर्षापर्यंत सातत्याने त्यामध्ये गुंतवणूक करत राहिला तर योजनेच्या परिपक्वतेनंतर तुमच्या खात्यात 25 लाख रुपयांची रक्कम तयार होऊ शकते. म्हणजेच दररोज 45 रुपये याप्रमाणे तुम्ही वर्षाला 16 हजार 300 रुपयांची बचत करून गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
बोनससह किती रक्कम मिळू शकते?
जसे आपण बघितले की दररोज 45 रुपयांची बचत केली तर वर्षाला तुम्ही 16 हजार 300 रुपये वाचवू शकतात व ही गुंतवणूक सतत 35 वर्ष केल्यानंतर जे पाच लाख 70 हजार पाचशे रुपयांचा निधी तयार होतो.
म्हणजेच तुमची गुंतवणुकीची मूळ रक्कम पाच लाख रुपये यामध्ये असेल व या पॉलिसीच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर रिव्हिजनरी बोनस प्राप्त होणार जो 8.60 लाख रुपये असेल व त्यासोबतच फायनल बोनस 11.50 लाख रुपये दिला जाईल. समजा तुमची पॉलिसी 15 वर्षाची असेल तर तुम्हाला एकदा नाही तर दोनदा यामध्ये बोनस प्राप्त होईल.
या पॉलिसीमध्ये मिळतात चार प्रकारचे रायडर
एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये कर सवलतीचा लाभ मिळत नाही. परंतु इतर प्रकारचे अनेक फायदे मिळतात. जसे की या प्लॅनमध्ये चार प्रकारचे रायडर मिळतात व हे रायडर म्हणजे एक्सीडेंटल डेथ अँड डिसेबिलिटी रायडर, न्यू टर्म इन्शुरन्स रायडर, एक्सीडेंट बेनिफिट रायडर आणि न्यू क्रिटिकल बेनिफिट रायडर यांचा समावेश होतो.
दुर्दैवाने काही कारणामुळे जर पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाला तर त्याला एक्सीडेंटल डेथ बेनिफिट दिला जातो व हा 125% असतो. इतकेच नाहीतर योजना पूर्ण होण्याआधीच पॉलिसीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला पूर्णवेळ झाल्यानंतर प्लॅनप्रमाणे मिळणारे पैसे मिळतात.