SBI Credit Card Rule: स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बँकेने कार्डचे नियमांमध्ये केले मोठे बदल

Ajay Patil
Published:

SBI Credit Card Rule:- आपल्यापैकी बरेच जण वेगवेगळ्या बँकांचे क्रेडिट कार्ड वापरत असतात. क्रेडिट कार्डचा वापर हा तसे पाहायला गेले तर आर्थिक दृष्टिकोनातून खूप फायद्याचा आहे. अगदी आर्थिक अडचणीच्या काळामध्ये क्रेडिट कार्ड हे खूप मदतीला येते.

परंतु क्रेडिट कार्डचा वापर करताना तो आर्थिक नियोजनाने करणे किंवा नियम समजून घेऊन करणे खूप महत्त्वाचे असते. नाहीतर यापासून फायदा होणे लांबच परंतु नुकसान जास्त होऊ शकते. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तसेच क्रेडिट कार्डच्या बाबतीत प्रत्येक बँकेचे त्यांचे त्यांचे नियम असतात व हे नियम देखील तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

अगदी नियमांच्या  अनुषंगाने पाहिले तर तुम्ही तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर  ही बातमी वाचणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण स्टेट बँकेच्या माध्यमातून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत व तुम्हाला ते माहिती असणे गरजेचे आहे.

 स्टेट बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये केला बदल

1- किमान रकमेबद्दलचा नियम आता स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्ड वरील जी काही किमान रक्कम असते तिच्या नियमांमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे. ती आता मोजतांना अशा पद्धतीने मोजली जाईल..

एकूण जीएसटी+ एमआयची रक्कम+ 100% फीस आणि चार्ज+ पाच टक्के वित्त शुल्क+ किरकोळ खर्च/ रोख पैसे काढण्याची रक्कम+ ओव्हर लिमिट रक्कम

किमान रकमेबद्दलचा हा नियम 15 मार्च 2024 पासून लागू होणार आहे.

2- भाडे भरल्यावर मिळणाऱ्या रिवार्ड बद्दलचा नियम बरेच व्यक्ती क्रेडिट कार्डचा वापर करून भाडे भरतात. एसबीआय ग्राहक देखील जर एसबीआय क्रेडीट कार्डचा वापर करून भाडे भरत असत तेव्हा त्यांना आधी रिवार्ड पॉईंट मिळायचे. परंतु आता नियमात बदल केल्यामुळे तसे होणार नाही. स्टेट बँकेच्या माध्यमातून काही क्रेडिट कार्ड करीता ही रिवार्ड पॉईंटची सुविधा बंद केली आहे.

3- या ठिकाणी मिळेल सदस्यत्व स्टेट बँक ऑफ इंडियाचे जे काही AURUM क्रेडिट कार्ड आहे त्या क्रेडिट कार्डधारकांना 16 गोष्ट 2023 पासून बँकेच्या माध्यमातून क्लब मेरीयटच्या सदस्यत्व देण्यात येत आहे व आता नवीन नियमानुसार त्यासोबत लाईव्ह मिंट आणि द वॉल स्ट्रीट जर्नलच्या डिजिटल आवृत्ती यांचे देखील सदस्य आता मिळणार आहे.

4- दोन हजार रुपयांचे व्हाउचर सिंपली क्लिक आणि सिंपली क्लिक ऍडव्हान्टेज क्रेडिट कार्डधारकांना आता बँकेच्या नवीन नियमानुसार एक लाख आणि दोन लाख रुपयांच्या ऑनलाईन खर्च केल्यावर दोन हजार रुपयांचे क्लियर ट्रिप आणि यात्रा ऑनलाईन व्हाउचर मिळणार आहे.

5- भाड्याच्या पेमेंटवर लागेल शुल्क जर तुम्ही एसबीआय क्रेडीट कार्डच्या माध्यमातून 17 मार्च 2023 नंतर भाडे भरले असेल तर तुम्हाला आता त्या व्यवहारावर जे काही कर लागू होतात त्या करांसह 199 रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागणार आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe