SBI New Car Loan:- प्रत्येकाला स्वतःची कार असावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु कारच्या किमती पाहिल्या तर प्रत्येकालाच हे स्वप्न पूर्ण करणे शक्य होत नाही. त्यामुळे बरेच जण बँकेच्या माध्यमातून कार लोनचा आधार घेतात. तसे पाहायला गेले तर प्रत्येक बँक ही कार लोन देत असते व प्रत्येक बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या लोन ऑफर दिल्या जातात.
यामध्ये जर आपण आघाडीचे बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा विचार केला तर या बँकेच्या माध्यमातून देखील कार लोनसाठीच्या अनेक योजना राबवण्यात येत असून त्यातीलच आपण जर एसबीआय नवीन कार लोन योजनेचा विचार केला तर या माध्यमातून नवीन गाडीच्या किंवा नवीन कारच्या ऑन रोड किमतीच्या 90% पर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. या लेखामध्ये आपण एसबीआय नवीन कार लोन योजनेची वैशिष्ट्ये आणि माहिती घेणार आहोत.
एसबीआय नवीन कार कर्ज योजना
स्टेट बँक ऑफ इंडिया या नवीन कार योजनेच्या माध्यमातून कर्जाकरिता सर्वोत्तम डील देते. या योजनेच्या माध्यमातून सर्वात कमी ईएमआय खर्च तसेच परवडणारे व्याजदर व कमीत कमी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. या कर्ज योजनेचा फायदा म्हणजे या माध्यमातून नवीन प्रवासी कार तसेच एमयुव्ही आणि एसयूव्ही खरेदीसाठी लोन घेऊ शकतात.
नवीन कार कर्ज योजनेची वैशिष्ट्ये
1- किती मिळते कर्ज?- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या नवीन कार योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये पाहिले तर या योजनेच्या माध्यमातून नवीन कारची जी काही ऑन रोड किंमत असते त्या किमतीला कर्ज पुरवठा करणे हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
म्हणजेच कारची जी काही ऑन रोड किंमत असेल त्या किमतीच्या 90% पर्यंत कर्ज या माध्यमातून उपलब्ध होते. या ऑन रोड किमतीमध्ये वाहनाची नोंदणी देखील समाविष्ट असून त्यासोबतच वाहनाचा विमा तसेच वारंटी/ वार्षिक देखभाल करार व ॲक्सेसरीजची किमतीचा देखील समावेश आहे.
किती आकारला जातो व्याजदर?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नवीन कार योजनेच्या माध्यमातून जर आपण घेतलेल्या कार कर्जाचा व्याजदरचा विचार केला तर तो आठ टक्क्यांपासून सुरू होतो व 8.70% पर्यंत जातो.
किती आकारले जाते प्रक्रिया शुल्क?
या योजनेच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या कार कर्जाकरिता आकारण्यात येणारे प्रक्रिया शुल्क खूप कमी प्रमाणात आकारले जाते. साधारणपणे एकूण कर्ज रकमेच्या 0.40%+ जीएसटी म्हणजेच जास्तीत जास्त 7500+ जीएसटी आणि कमीत कमी 1000+ जीएसटी इतके प्रक्रिया शुल्क लागते.
एसबीआयच्या नवीन कार कर्ज योजनेसाठी ची पात्रता
1- सरकारी कर्मचारी– यामध्ये केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे कर्मचारी, डिफेन्स म्हणजे संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी, मिलिटरी पॅकेज आणि इंडियन कोस्टल गार्ड पॅकेज यामधील कर्मचारी आणि विविध संरक्षण आस्थापनांचे शॉर्ट कमिशन्ड अधिकारी यांचा समावेश होतो.
त्यामध्ये वार्षिक उत्पन्न अर्जदार व सह अर्जदाराचे किमान तीन लाख रुपये असणे गरजेचे असून या योजनेच्या माध्यमातून कमाल कर्जाची रक्कम ही महिन्याच्या उत्पन्नाच्या 48 पट इतकी आहे.
2- खाजगी क्षेत्र– व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती, व्यावसायिक लोक तसेच मालकी / भागीदारी संस्था आणि इतर आयकर नोंदणीकृत व्यक्ती एकूण करपात्र उत्पन्नाच्या चार पट किंवा चार वेळा कर्जाचा लाभ घेऊ शकतात. खाजगी क्षेत्रातील अर्जदारांसाठी उत्पन्नाचा निकष पाहिला तर तो निव्वळ नफा किंवा एकूण त्यांचे करपात्र उत्पन्न हे तीन लाख वार्षिक असावे.
3- कृषी क्षेत्र– शेतकऱ्यांच्या बाबतीत पाहिला तर शेतकऱ्यांकरिता आयकरचा तपशील देणे गरजेचा नाही. शेतकऱ्यांना स्टेट बँकेच्या या कार योजनेच्या माध्यमातून त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या तीन पट कर्जाची रक्कम मिळू शकते. अर्जदार आणि सह अर्जदार यांचे निव्वळ वार्षिक उत्पन्न कमीत कमी चार लाख रुपये असणे गरजेचे आहे.