Fixed Deposit : चांगल्या आणि सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. तुम्ही देखील सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर, एफडी मधील गुंतवणूक तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. कारण देशातील सर्वात मोठ्या बँकेने आपल्या एफडी व्याजदरात वाढ केली आहे. देशातील गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय म्हणजे एफडी, कारण येथील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतणूक मानली जाते तसेच परतावा देखील निश्चित असतो.
एफडीवर प्रत्येक बँक वेगवेगळे व्याजदर ऑफर करते, त्यावर मिळणारा परतावाही वेगळा असतो. अशातच देशातील ही सर्वात मोठी बँक आपल्या एफडीवर उच्च परतावा ऑफर करत आहे.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने अमृत कलश स्पेशल एफडी योजनेची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. या विशेष FD योजनेअंतर्गत, SBI आपल्या सामान्य ग्राहकांना 7.1% व्याज देत आहे तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.60% व्याज देत आहे. SBI ची ही 400 दिवसांची विशेष FD योजना 15 फेब्रुवारी रोजी लाँच करण्यात आली होती.
SBI चे FD दर
स्टेट बँक ऑफ इंडिया 7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 3%, 46 दिवस ते 179 दिवसांच्या FD वर 4.50% आणि 180 दिवस ते 210 दिवसांच्या FD वर 5.25% व्याज देत आहे. याशिवाय, बँक 211 दिवसांपासून 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.75% आणि 1 वर्षापासून 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.8% व्याज देत आहे.
दुसरीकडे, स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7%, 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी FD वर 6.50% आणि 5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 6.50% व्याज ऑफर करते. बँक आपल्या ‘अमृत कलश’ अंतर्गत 400 दिवसांसाठी आपल्या सामान्य ग्राहकांना 7.10% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.60% व्याज देत आहे.