Scheme For Girls: मुलगी 21 वर्षाची झाली की मिळतील 6 लाख! वाचा मुलींसाठी असलेल्या विशेष योजनेची माहिती

सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेली बेटी बचाव बेटी पढाओ ही योजना खूप महत्त्वपूर्ण आहे. मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून या योजनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे या अंतर्गत मुलींना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यापासून त्यांच्या मते विविध कौशल्यांचा विकास करण्याचे महत्त्वपूर्ण काम देखील केली जाते.

Ajay Patil
Published:
scheme for girls

Scheme For Girls:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात. समाजामध्ये जगत असताना त्यांचा सामाजिक आणि आर्थिक जीवनमान उंचवावे याकरिता या योजनेच्या माध्यमातून सरकार अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलत आहेत.

तसेच सरकारच्या माध्यमातून लहान मुलींकरिता देखील अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या  जातात व जेणेकरून त्यांचा भविष्यकाळ आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षित करता येईल हा त्यामागचा उद्देश असतो. मुलींच्या पुढील भविष्यामध्ये त्यांना उच्च शिक्षण किंवा इतर गोष्टींकरिता आर्थिक अडचण भासू नये याकरिता या योजनांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.

अगदी याच पद्धतीने जर आपण मुलींसाठी असलेल्या योजनांच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेली बेटी बचाव बेटी पढाओ ही योजना खूप महत्त्वपूर्ण आहे.

मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून या योजनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे या अंतर्गत मुलींना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यापासून त्यांच्या मते विविध कौशल्यांचा विकास करण्याचे महत्त्वपूर्ण काम देखील केली जाते.

 कसे आहे बेटी बचाव बेटी पढाओ योजनेचे स्वरूप?

ही योजना प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2015 मध्ये सुरू केली व या अंतर्गत मुलींमध्ये शिक्षणाविषयीची जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देते. या योजनेमध्ये मुलींच्या नावे खाते उघडणे गरजेचे असते व मुलीच्या आईवडील दर महिन्याला एक हजार रुपये जमा करू शकतात किंवा वर्षाला 12000 रुपये जमा करू शकतात.

या योजनेत खाते उघडण्यासाठी 14 वर्षे पूर्ण होतात तेव्हा एकूण एक लाख 68 हजार रुपये यामध्ये जमा होतात. नंतर जेव्हा मुलगी 21 वर्षाची होते तेव्हा 6 लाख 7 हजार 128 रुपये मुलीला या माध्यमातून मिळतील. हे पैसे मुलीला उच्च शिक्षणासाठी कामी येऊ शकतात व लग्नासाठी देखील या पैशांचा वापर होऊ शकतो.

 कोणत्या मुलीला घेता येऊ शकतो लाभ?

केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी एका कुटुंबातील फक्त दोन मुलींना अर्ज करता येणे शक्य आहे. यामध्ये मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे व त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुलीचे खाते सुकन्या समृद्धी योजनेत असणे बंधनकारक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe