Senior Citizens FD Schemes : ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! देशातील या 4 मोठ्या बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज

Ahmednagarlive24 office
Published:
Senior Citizens FD Schemes

Senior Citizens FD Schemes : समजा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगले पर्याय शोधत असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता बँकेचे मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करू शकता. कारण ज्येष्ठ नागरिकांना सामान्यत: इतर नागरिकांप्रमाणे मुदत ठेवींवर जास्त व्याज दिले जाते.

सध्या अशा काही बँका आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर सामान्य नागरिकांपेक्षा जास्त व्याज देत आहेत. जर तुम्हीही या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली तर त्याचा फायदा तुम्हाला होईल. फेडरल बँक,अॅक्सिस बँक,सूर्योदय SFB आणि कॅनरा बँकेच्या मुदत ठेवींमध्ये जास्त व्याज दिले जात आहे.

जाणून घ्या फेडरल बँक एफडी व्याजदर

फेडरल बँकेच्या मतानुसार, ज्येष्ठ नागरिकांना 13 महिन्यांच्या मुदतीच्या एफडीवर गुंतवणुकीवर 8.07% दराने व्याज मिळत आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य ग्राहकांसाठी गुंतवणुकीवर 7.30 टक्के दराने व्याज दिले जात आहे. बँकेचे हे नवीनतम दर 15 ऑगस्ट 2023 पासून लागू आहेत.

जाणून घ्या अॅक्सिस बँक एफडी व्याजदर

Axis Bank ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर गुंतवणुकीवर 3.5% ते 8.05% दराने 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीत ठेवींवर व्याज देण्यात येत आहे. हे दर 14 ऑगस्ट 2023 पासून लागू झाले आहेत. तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी, बँक एफडीवर गुंतवणुकीवर 3.5% ते ७.३% दराने व्याज दिले जात आहे. हे व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू आहेत.

जाणून घ्या सूर्योदय SFB एफडी व्याजदर

Suryoday SFB ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 4.50% ते 9.10% व्याजदराचा लाभ देत आहे. त्याच वेळी, ही बँक 4% ते 8.60% पर्यंतच्या व्याजाचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांसाठी दिला जात आहे. तर हे दर 7 ऑगस्टपासून लागू झाले आहेत.

जाणून घ्या कॅनरा बँक एफडी व्याजदर

कॅनरा बँक ज्येष्ठ नागरिकांना बँक एफडीवर 4% ते 7.75% व्याज देण्यात येत आहे. हे दर 12 ऑगस्ट 2023 पासून लागू झाले आहेत. तर ही बँक 444 दिवसांच्या कालावधीसाठी 5.35% ते 7.90% दराने व्याज देत आहे. बँक 4% ते 7.25% व्याजाचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांना देत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe