Share Market : या आठवड्यात शेअर बाजारात सुमारे 2 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली असली, तरी कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे (Q3) आर्थिक निकाल आणि त्यानंतर आलेल्या ब्रोकरेज अहवालांमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा निवडक शेअर्सकडे वळले आहे.
Motilal Oswal, Goldman Sachs, Nuvama Wealth Management आणि JM Financial यांसारख्या नामांकित संशोधन संस्थांनी बँकिंग, फायनान्स, ऑटो, आयटी आणि कंझ्युमर सेक्टरमधील अनेक शेअर्सवर आपले ‘Buy’ रेटिंग कायम ठेवले असून टार्गेट प्राइस जाहीर केले आहेत.

Motilal Oswal ने Bandhan Bank वर विश्वास कायम ठेवत 175 रुपयांचा टार्गेट प्राइस दिला आहे. बँक गेल्या काही वर्षांपासून एनपीए समस्येमुळे अडचणीत होती, मात्र आता हा नकारात्मक टप्पा संपत असल्याचे ब्रोकरेजचे मत आहे. त्यामुळे पुढील काळात बँकेच्या नफ्यात आणि वाढीत सुधारणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
JM Financial ने Eternal या शेअरवर ‘Buy’ रेटिंग कायम ठेवत 400 रुपयांचा टार्गेट दिला आहे. Blinkit ने अपेक्षेपेक्षा लवकर EBITDA breakeven गाठल्याने आणि फूड डिलिव्हरी व्यवसायातील मजबूत कामगिरीमुळे Eternal चा आउटलुक सकारात्मक असल्याचे ब्रोकरेजने नमूद केले आहे.
Nuvama Wealth Management ने United Spirits वर ‘Buy’ कायम ठेवले असले तरी टार्गेट प्राइस 1,660 रुपयांपर्यंत कमी केला आहे. महाराष्ट्रातील धोरणात्मक बदल आणि आंध्र प्रदेशातील मागील वर्षीचे स्टॉकिंग यामुळे विक्रीवर परिणाम झाला असला, तरी परिस्थिती सुधारण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याचबरोबर JSW Infrastructure वर 360 रुपयांचा टार्गेट देत ‘Buy’ रेटिंग कायम ठेवण्यात आले आहे.
Motilal Oswal ने Supreme Industries (टार्गेट 4,200 रुपये) आणि Indian Hotels Company (टार्गेट 850 रुपये) या शेअर्सवरही सकारात्मक दृष्टीकोन व्यक्त केला आहे. तसेच LTIMindtree साठी 7,900 रुपयांचा टार्गेट देण्यात आला आहे.
दरम्यान Goldman Sachs ने Havells India वर 1,880 रुपयांचा टार्गेट दिला असून, JM Financial ने LG Electronics India वर प्रथमच कव्हरेज सुरू करत 1,630 रुपयांचा टार्गेट प्राइस जाहीर केला आहे. बाजारातील चढ-उतारांनंतरही ब्रोकरेज हाऊसेसचा निवडक मजबूत कंपन्यांवरचा विश्वास कायम असल्याचे यावरून स्पष्ट होते.













