Share Market:-शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमीची समजली जाते. परंतु व्यवस्थित अभ्यास करून आणि तज्ञांच्या सहाय्याने जर यामध्ये गुंतवणूक केली तर निश्चितच यामधून देखील चांगला परतावा मिळणे शक्य आहे. जर आपण गेल्या काही वर्षापासून पाहिले तर वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना आपल्याला दिसून येत असून ग्रामीण भागामध्ये देखील याचे प्रमाण आता वाढत आहे.
सध्या जर आपण शेअर बाजाराची स्थिती पाहिली तर ती काहीशी चढउताराची असून बाजाराची स्थिती ओळखून गुंतवणूकदार देखील वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
तसे पाहायला गेले तर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याअगोदर बाजारातील प्रसिद्ध असलेल्या तज्ञांच्या माध्यमातून किंवा त्याच्या सल्ल्याने गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. अगदी याच पद्धतीने जर आपण बघितले तर शेअर बाजारातील तज्ञ असलेले विकास सेठी यांनी शॉर्ट टर्म गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत. त्यांचीच माहिती आपण थोडक्यात घेऊ.
शॉर्ट टर्म गुंतवणुकीसाठी हे शेअर्स ठरतील फायद्याचे
1- तेजस नेटवर्क कंपनीचे शेअर्स– या कंपनीच्या शेअर्स बद्दल माहिती देताना विकास सेठी यांनी माहिती देताना म्हटले की, टाटा ग्रुपची टेलिकॉम तेजस नेटवर्क कंपनी येणाऱ्या कालावधीमध्ये चांगला नफा देऊ शकते. सध्याच्या परिस्थितीत या कंपनीच्या शेअरची किंमत पाहिली तर ती 1275 रुपये असून या कंपनीच्या शेअर्समध्ये जर गुंतवणूक करायची असेल
तर त्याकरिता 1240 रुपयांचा स्टॉप लॉस आणि 1325 रुपयांचे शॉर्ट टर्म टार्गेट ठेवणे गरजेचे आहे. तेजस नेटवर्क कंपनी टेलिकॉम कंपन्यांसाठी अनेक प्रकारची उपकरणे पुरवण्याचे काम करते व ही कंपनी टीसीएस या कंपनीसोबत सध्या पंधरा हजार कोटी रुपयांच्या एका प्रकल्पावर काम देखील करत आहे.
2- अपोलो मायक्रो सिस्टम– शॉर्ट टर्म गुंतवणुकीसाठी विकास सेठी यांनी दुसरी कंपनी अपोलो मायक्रो सिस्टम ही सुचवली असून या कंपनीचे शेअर सध्या तेजीत दिसून येत आहेत. शुक्रवारी या कंपनीच्या शेअरमध्ये पाच टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली व सध्या या शेअर्सची किंमत 107.75 रुपयांवर आहे.
या शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी शंभर रुपयांचा स्टॉप लॉस आणि 115 रुपयांचे टार्गेट निश्चित करणे गरजेचे आहे.ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काम करते व इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करते. प्रामुख्याने डिफेन्स आणि एरोस्पेस व एव्हीओनिक्स त्यामध्ये या कंपनीचे काम मोठे आहे.
इंडियन आर्मी आणि डीआरडीओ हे अपोलो मायक्रो सिस्टम कंपनीचे प्रमुख ग्राहक आहेत. ही कंपनी हैदराबाद मध्ये एक नवा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट तयार करत असून सरकारच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीला दिले जाणाऱ्या पाठिंबामुळे या कंपनीच्या कामात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कंपनीतील गुंतवणूक येणाऱ्या दिवसात चांगला फायदा देऊ शकते.
(टीप– ही माहिती प्राथमिक स्वरूपाची असून याबद्दल आम्ही कोणालाही गुंतवणुकीचा सल्ला किंवा गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देत नाही. तुम्हाला जर शेअर्स बाजार किंवा या क्षेत्रात गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.)