गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी ! ‘ही’ कंपनी देणार 35 रुपयांचा लाभांश

Published on -

Share Market News : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी लाभांश ही नेहमीच दिलासादायक बाब ठरते. अनेक जण बोनस शेअर्स तसेच लाभांश देणाऱ्या कंपन्यांकडे लक्ष ठेवून असतात.

दरम्यान जर तुम्ही अशाच कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

अभियांत्रिकी सेवा क्षेत्रातील कंपनी TAAL Tech Limited ने आपल्या गुंतवणूकदारांसाठी दुसरा अंतरीम लाभांश जाहीर केला आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर ३५ रुपयांचा दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.

लाभांश मिळवण्याची रेकॉर्ड तारीख   

कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. कंपनीकडून एकूण १० कोटी ९० लाख ७१ हजार ९७० रुपयांचा लाभांश वितरित केला जाणार आहे.

या लाभांशासाठीची रेकॉर्ड तारीख सुद्धा फायनल झाली आहे. १६ जानेवारी रोजी कंपनी एक्स डिव्हीडंड ट्रेड करणार आहे.

म्हणजे या तारखेपर्यंत कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये किंवा डिपॉझिटरी रेकॉर्डमध्ये ज्यांची नावे असतील, ते सर्व शेअर होल्डर्स लाभांश मिळविण्यास पात्र ठरणार आहेत.

या योजनेअंतर्गत जे गुंतवणूकदार लाभांशासाठी पात्र ठरतील त्यांना ५ फेब्रुवारी पर्यंत लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याआधी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर तीस रुपयांचा अंतरीम लाभाशं दिला होता. आता पुन्हा एकदा कंपनीने लाभांश वितरित करण्याची घोषणा केली आहे आणि यामुळे सध्या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आहेत. 

TAAL Tech Limited चे मार्केट कॅप सुमारे ९५१ कोटी रुपये इतके आहे. बीएसईवर या हा स्टॉक ३,०३३.८५ रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करत आहे. कंपनीचे पूर्वीचे नाव TAAL Enterprises Limited असे होते.

ही कंपनी अभियांत्रिकी सेवा क्षेत्रात कार्यरत असून, विविध औद्योगिक आणि तांत्रिक प्रकल्पांसाठी सेवा पुरवते. गेल्या ६ महिन्यांत या स्टॉकच्या किंमतीत सुमारे ११ टक्क्यांची घसरण झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe