Share Market News:- सध्या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर तेजी दिसून येत असून अनेक कंपन्यांच्या शेअरने चांगली कामगिरी केलेली आहे. जर आपण आजचा विचार केला तर सुमारे तीनशे अंकांच्या वाढीसह सेन्सेक्सने पुन्हा एकदा बहात्तर हजाराचा टप्पा ओलांडला आहे.
निफ्टी देखील 70 पेक्षा जास्त अंकांनी वर असून तो 21 हजार 730 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आजच्या व्यवहारात पावर आणि आय टी शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदीचा कल दिसून येत असून एनटीपीसीने सेन्सेक्स वर सर्वाधिक अडीच टक्क्यांनी वाढ केली आहे.
सेन्सेक्स मधील 30 समभागांपैकी 26 वाढत असून चार समभाग घसरताना दिसून येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठे बांधकाम कंपनी असलेल्या एल अँड टी सध्या आयोध्यातील राम मंदिर बांधकामात असून ही देशातील सर्वात मोठी बांधकाम कंपनी आहे.
जेव्हा राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले तेव्हापासून एल अँड टी कंपनी राम मंदिर उभारणीमध्ये असून तेव्हापासून या कंपनीच्या शेअर्सने 270 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. साधारणपणे 5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिराचे बांधकाम किंवा निर्माण कार्य सुरू झाले त्यावेळी या कंपनीच्या शेअरची किंमत 934 होती व काल म्हणजे चार जानेवारीला त्याच्या शेअरची किंमत 3452 रुपयेच्या पातळीवर व्यवहार करीत होते.
राम मंदिराच्या बांधकामात एल अँड टी चे काय आहे काम?
22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरात रामलल्लाचा अभिषेक सोहळा संपन्न होणार असून यावेळी प्रभू रामाच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. अशा सगळ्या परिस्थितीत राम मंदिर बांधकामांमध्ये एल अँड टी कंपनीचे योगदान असून एल अँड टी ला राम मंदिर बांधण्याचे कंत्राट मिळाले आहे व या मंदिराचे मुख्य रचना उभारण्याचे काम एल एन्ड टी कडे आहे.
आतापर्यंत गुंतवणूकदारांना किती मिळाला परतावा?
एल अँड टी शेअर्सने आतापर्यंत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला असून ब्रोकरेजला देखील यापुढे असाच परतावा मिळेल अशी आशा आहे. या कंपनीच्या शेअर्समुळे येणाऱ्या काळात देखील गुंतवणूकदारांना चांगले उत्पन्न मिळण्याचा विश्वास असल्यामुळे ब्रोकरेज कडून
या शेअर खरेदीसाठी लक्ष किंमत दिली आहे. आपण याबाबतीत जागतिक ब्रोकरेज कंपनी नोमुराचा विचार केला तर या कंपनीच्या शेअरवर खरेदीचे मत या ब्रोकरेजने कायम ठेवले असून यासाठी टारगेट प्राईज चार हजार रुपये पर्यंत वाढवली आहे.