अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- इराकमध्ये 21 दहशतवादी आणि मोरकर्यांना सोमवारी सामूहिक पद्धतीने फासावर लटकावण्यात आले. इराकच्या अंतर्गत मंत्रालयाने एक वक्तव्य जारी करून ही माहिती दिली. इराकमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याच्या बातम्या नेहमीच येत असतात. गेल्या काही दिवसात इराकमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत.
नुकतेच इराकमध्ये एकाच दिवशी 21 दहशतवादी आणि मारेकऱ्यांना सोमवारी सामूहिकरित्या फाशी देण्यात आली. इराकच्या अंतर्गत मंत्रालयाने एक निवेदन जारी करत याबाबत माहिती दिली आहे. दक्षिण इराकमधील नासिरियाच्या तुरूंगात या दहशतवादी आणि मारेकाऱ्यांना फाशी देण्यात आली.
यामध्ये उत्तरेकडील तल-अफर शहरात दोन आत्मघाती हल्ल्यांमध्ये सहभागी असणाऱ्या आरोपींचा देखील समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये 12 पेक्षा अधिक लोक ठार झाले होते. अमेरिका समर्थक सैन्य अभियानात 2014 ते 2017 च्या दरम्यान इस्लामिक स्टेटला पराभूत केल्यानंतर इरामध्ये शेकडो संशयित जिहादींवर खटला
चालवण्यात आला आणि अनेकदा सामूहिक पद्धतीने फाशी देण्यात आली. मानवाधिकार समूहाने इराकी आणि अन्य क्षेत्रीय दलांवर न्यायालयीन प्रक्रियेत विसंगती आणि खटल्यात कमतरतेचा आरोप केला आहे, परंतु इराकचे म्हणणे आहे की, त्यांचे खटले निष्पक्ष आहेत.
दरम्यान इराकच्या अंतर्गत मंत्रालयाने आपल्या निवेदनात फाशी दिलेल्या दहशतवादी आणि मारेकऱ्यांची ओळख उघड केलेली नाही, तसेच त्यांना कोणत्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आहे याबाबतची देखील माहिती त्यांनी दिलेली ऩाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedpp