अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-मागील आठवड्यात देशातील बेरोजगारीचा दर 7.8 टक्के होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) च्या ताज्या अहवालानुसार या कालावधीत लेबर पार्टिसिपेशन रेट (LPR) 39.3 टक्के होता, ज्यामुळे रोजगार दर झपाट्याने 36.24 टक्क्यांवर घसरला.
जूनअखेरपर्यंत रोजगाराचा हा दर सर्वात कमी आहे. 25 ऑक्टोबरनंतर सलग चौथ्या आठवड्यात ऐप्लॉयमेंट रेट कमी झाले आहेत. 15 नोव्हेंबरला हा दर 37.38 टक्के होता. सीएमआयईने आपल्या अहवालात म्हटले आहे की लॉकडाउनपूर्वी एंप्लॉयमेंट रेट पहिल्या पातळीवर पोहोचलेले नाही. उलट ते पुन्हा कोसळू लागले आहे.
2019-20 मध्ये एंप्लॉयमेंट रेट 39.4% होता :- 2019-20 मध्ये एंप्लॉयमेंट रेट 39.4 टक्के होता. एप्रिलमध्ये तो घसरून 27.2 टक्क्यांवर आला होता. मे मध्ये 30.2 टक्क्यांवर आणि ऑक्टोबरमध्ये 37.8 टक्क्यांपर्यंत सुधारला होता. नोव्हेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यांत त्यात सातत्याने घट झाली आहे. बेरोजगारीचा दर पहिल्या आठवड्यात 37.5 टक्के, दुसर्या आठवड्यात 37.4 टक्के आणि तिसर्या आठवड्यात 36.2 टक्के झाला.
बेरोजगारीचा दर 5 आठवड्यांत सर्वाधिक:- सध्याचा 7.8 टक्क्यांच्या बेरोजगारीचा दर हा मागील आठवड्यातील 5.5 टक्के आणि त्यामागील चार आठवड्यांपेक्षा तुलनेत खूपच जास्त आहे. गेल्या चार आठवड्यांत बेरोजगारीचे प्रमाण 5.5 ते 7.2 टक्क्यांच्या दरम्यान आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved