Silver Price Hike : चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 2025 हे वर्ष चांदीसाठी खास राहिले आहे. चांदीचे रेट दिवसेंदिवस नवीन विक्रम मोडताना दिसतात. सध्या चांदीच्या किमतीने अडीच लाखांचा टप्पा पार केला आहे.
यामुळे मागील वर्षी सुरुवातीला ज्यांनी चांदीमध्ये पैसा लावला त्यांना मोठा फायदा झालाय. चांदीच्या गुंतवणुकीतून खऱ्या अर्थाने गुंतवणूकदारांना सोन्याचे दिवस पाहायला मिळतायेत. दरम्यान आता चांदीच्या रेट बाबत एक मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे.

या मौल्यवान धातूच्या किमती येत्या काळात सुद्धा अशाच तेजीत राहतील असा अंदाज समोर आला आहे. अशा परिस्थितीत आता आपण चांदीच्या किमती किती पर्यंत वाढू शकतात? याबाबत तज्ञांचे म्हणणे नेमके काय आहे याचाच आढावा घेणार आहोत.
चांदीच्या दरवाढीचे कारणे
चांदीच्या दरवाढीची स्पेसिफिक असे एक कारण नाही. पण सोलर पॅनल, ईव्ही दुचाकी-चारचाकी वाहने तसेच अन्य पर्यावरणपूरक उपकरणांची मागणी जगभरात झपाट्याने वाढली आहे.
याचाच परिणाम म्हणून आता चांदीच्या किमती वाढताना दिसतात. कारण म्हणजे या प्रकारच्या उत्पादनांमध्ये चांदीचा वापर होतो. पर्यावरणाची हानी कमी व्हावी यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य मिळत आहे.
अक्षय ऊर्जावर डेव्हलप करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाला सध्या मोठ्या प्रमाणात प्राधान्य मिळतय. शासन सुद्धा अशाच धोरणाला अधिक पाठबळ देताना दिसते आणि याचा थेट फायदा चांदीला मिळतोय.
अशा प्रकारच्या उद्योगांमध्ये चांदी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. थोडक्यात चांदीचा औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे आणि याचा दरवाढीला फायदा मिळतोय. सोलर पॅनल, ईव्ही, सेमीकंडक्टर, बॅटरी, तसेच इलेक्ट्रॉनिक गॅझेट्समध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याने याची मागणी आधीच्या तुलनेत अधिक झाली आहे.
विद्युत वाहकता, टिकाऊपणा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी चांदी हा एक महत्त्वाचा धातू आहे. एका अहवालानुसार आजच्या घडीला औद्योगिक क्षेत्रातील चांदीची मागणी तब्बल 58 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
तज्ञ लोक सांगतात की एक इलेक्ट्रिक वाहन तयार करण्यासाठी साधारणता 50 ग्रॅम एवढी संधी वापरली जाते. यावरून आपल्या लक्षात येईल की या क्षेत्रात चांदीला किती मागणी असेल आणि या गोष्टीचा चांदीच्या दरवाढीला किती लाभ मिळत असेल. दरम्यान याच कारणांमुळे या एका क्षेत्रातूनच चांदीची मागणी 16 टक्क्यांनी वाढली आहे.
जागतिक बाजारपेठेचा विचार करता चीन हा चांदीच्या निर्यातीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र चांदी थेट विकून मर्यादित नफा मिळवण्यापेक्षा सोलर पॅनल, सेमीकंडक्टरसारखी मूल्यवर्धित उत्पादने तयार करून त्यांची निर्यात केल्यास अधिक परकीय चलन मिळू शकते, असा निर्णय चीनने घेतला आहे.
त्यामुळेच 1 जानेवारीपासून चीनने चांदीच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा तुटवडा निर्माण झाला असून सलग पाचव्या वर्षी पुरवठ्यात शॉर्टेज दिसून येत आहे.
चांदीच्या किमती किती वाढू शकतात?
आता आपण मूळ प्रश्नाकडे येऊ ती म्हणजे चांदीची किंमत येत्या काळात किती होईल. मिळालेल्या माहितीनुसार काल चांदीची किंमत अडीच लाखांच्या पार गेली होती. दरम्यान सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांच्या मते, सोलर पॅनल आणि ईव्हीमधील वाढती मागणी तसेच चीनचे निर्यात निर्बंध यामुळे चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
आजच्या घडीला चांदीचा दर अडीच लाख रुपये प्रति किलोच्या आसपास आहे. पण मागणी अशीच कायम राहिली तर लवकरच हे दर 3 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणजेच किलोमागे चांदीच्या किमती 50 हजारांनी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, दरात झालेल्या मोठ्या वाढीनंतर काही गुंतवणूकदार नफा बुक करण्यासाठी या परिस्थितीत चांदीची विक्री करू शकतात.
त्यामुळे अधूनमधून दरात तात्पुरती घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र दीर्घकालीन दृष्टीने पाहता चांदीची मागणी मजबूत असून दरातील घसरण अल्पकालीन राहून पुन्हा तेजीचा कल दिसण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे आता खरंच येत्या काळात चांदीच्या किमती 3 लाखांचा टप्पा पार करणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.













