एखाद्या गोष्टींमध्ये यश मिळणे हे दिसायला खूप सोपे असते किंवा एखाद्या यशस्वी व्यक्तीला जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण खूप भारावून जातो किंवा आपल्याला अशा व्यक्तींचे खूप अप्रूप वाटते. परंतु या यशामागे जर त्याचा खडतर प्रवास व त्यांची मेहनत पाहिली तर ती आपण विचार देखील करू शकत नाही इतक्या उच्च दर्जाची व सातत्यपूर्ण असते.
आज आपण जर एखादा यशस्वी व्यक्तीचा उद्योग किंवा व्यवसाय पाहिला तर तो नक्कीच एवढा मोठा स्वरूपामध्ये सुरुवातीला नसतो. अशा व्यक्तींनी सुरुवात अगदी छोट्या प्रमाणामध्ये केलेली असते व जिद्द, कष्ट आणि सातत्याच्या जोरावर अशा व्यवसायांमध्ये ते वाढ करत करत यशाच्या शिखरावर पोहोचतात.
अशीच काहीशी गोष्ट आपल्याला सौंदरराजन बंधूंच्या बाबतीत सांगता येईल. दोघा भावांनी देखील पाच हजार रुपये गुंतवणूक करून पोल्ट्री व्यवसायला सुरुवात केली व आज त्यांच्या या पोल्ट्री व्यवसायाच्या उलाढाल बारा हजार कोटींच्या पुढे गेलेली आहे.
सौंदर राजन बंधूंची यशोगाथा
बी सौंदरराजन आणि जीबी सौंदरराजन हे दोन्ही भाऊ आज भारतातील सर्वात श्रीमंत पोल्ट्री शेतकरी म्हणून ओळखले जातात. परंतु जेव्हा हे दोन्ही भाऊ लहान होते तेव्हा त्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खूपच बेताची होती व त्यामुळे साहजिकच त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
भाजीपाला व्यवसाय आणि एक भाऊ कृषी पंप कंपनीमध्ये नोकरी करत होता व त्यानंतर मात्र दोन्ही भावांनी 1984 मध्ये पोल्ट्री व्यवसाय करायचा ठरवला व त्याकरिता त्यांनी पाच हजार रुपयांची छोटीशी गुंतवणूक करून पोल्ट्री व्यवसायाला सुरुवात केली.
हा पोल्ट्री व्यवसाय त्यांनी कोईमतूर पासून ७२ किलोमीटर अंतरावर असलेल्या उदुमलाईपेट्टई या ठिकाणी सुरू केला. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करत आज जवळपास 40 वर्षांनी त्यांचा हा व्यवसाय 12000 कोटी रुपये वार्षिक उलाढालीपर्यंत पोहोचला आहे असून भारतातील सर्वात मोठा पोल्ट्री व्यवसाय म्हणून तो ओळखला जातो.
सुगुना फुड्स आली नावारूपाला
सुगुना फुड्स ही त्यांची कंपनी असून यामध्ये आता देशातील जवळपास 18 राज्यांमधील 15000 पेक्षा अधिक गावातील 40,000 शेतकरी जोडले गेलेले आहेत. बी सौंदर राजन हे या कंपनीचे चेअरमन असून त्यांचा मुलगा विघ्नेश या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे.
सुगुना कंपनीचे जेव्हा स्थापना झाली तेव्हा सात वर्षात 40 शेतकरी त्यांच्यामध्ये जोडले गेलेले होते व उलाढाल सात कोटींच्या पुढे होती. परंतु आज तामिळनाडू राज्यामध्ये सुगुना चिकन हे एक खूप प्रसिद्ध असे नाव आहे.
सौंदर राजन बंधूंना या व्यवसायाविषयी कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना आणि माहिती नसताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर यामध्ये प्रगती केलेली आहे.
त्याच्या या व्यवसायाची उलाढाल किती आहे?
जर आपण त्यांच्या या व्यवसायाची उलाढाल बघितली तर 2021 या आर्थिक वर्षांमध्ये ती 9,155.4 कोटी रुपये होती आणि 2020 मध्ये त्यांच्या या कंपनीचे मूल्य आठ हजार 739 कोटी रुपये होते. 2021 मधील नफा पहिला तर 358.89 कोटी होता. जर आपण सुगुना कंपनीची सध्याची उलाढाल पाहिली तर ती बारा हजार कोटींच्या घरात आहे.