‘सॉरी मॅडम’ नावाने सुरू केले कपड्यांचे छोटे दुकान; आज आहे 150 कोटींचा कपड्यांचा ब्रँड, वाचा राज नवानी यांची यशोगाथा

नोस्ट्रम या फॅशन जगतातील सगळ्यात मोठ्या ब्रँडचे मालक राज नवानी यांची यशोगाथा पाहिली तर ती अनेकांना प्रेरणादायी अशीच आहे. त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली 1995 मध्ये पाच लाख रुपये कर्ज घेतले व सॉरी मॅडम नावाने छोटेसे कपड्यांचे दुकान सुरू करून हाच व्यवसाय त्यांनी आज फॅशनच्या जगामध्ये एक स्वतःच्या ओळखीच्या जीवावर सर्वात्तम असा बनवलेला आहे.

Published on -

एखाद्या व्यवसायाची सुरुवात अगदी छोट्या स्वरूपामध्ये करून कालांतराने तो व्यवसाय लाखो ते कोटींच्या घरात पोहोचवणे ही काही साधी सोपी गोष्ट नाही. परंतु असे अनेक व्यक्ती आहेत की ते आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवतात आणि रात्रंदिवस मेहनत करून आपण उभारलेले छोटेसे व्यवसायाचे रूपांतर एक मोठ्या साम्राज्यात करतात.

भारतातील अनेक उद्योजकांची यशोगाथा बघितली तर ते आपल्याला या प्रकारचे दिसून येते. सर्वात छोटी परंतु कालांतराने पूर्ण जगात नाव असलेले अनेक उद्योजक आपल्याला भारतात पाहायला मिळतात.

याच पद्धतीने जर आपण नोस्ट्रम या फॅशन जगतातील सगळ्यात मोठ्या ब्रँडचे मालक राज नवानी यांची यशोगाथा पाहिली तर ती अनेकांना प्रेरणादायी अशीच आहे. त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली 1995 मध्ये पाच लाख रुपये कर्ज घेतले व सॉरी मॅडम नावाने छोटेसे कपड्यांचे दुकान सुरू करून हाच व्यवसाय त्यांनी आज फॅशनच्या जगामध्ये एक स्वतःच्या ओळखीच्या जीवावर सर्वात्तम असा बनवलेला आहे.

 राज नवानी यांची प्रेरणादायी कथा

राज नवानी हे मूळचे मध्यप्रदेश राज्यातील दमोह या ठिकाणचे असून या ठिकाणीच त्यांनी फॅशनच्या जगामध्ये एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. कपड्यांच्या एका छोट्याशा दुकानापासून त्यांनी सुरुवात केली व आज त्यांचा नोस्ट्रम नावाचा फॅशन ब्रँड प्रसिद्धीस व नावारूपाला आलेला आहे. 1995 मध्ये त्यांनी पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले व सॉरी मॅडम नावाने कपड्यांचे एक छोटेसे दुकान सुरू केले.

अखंड मेहनत व कष्टाच्या जीवावर त्यांनी या छोट्याशा व्यवसायाचे रूपांतर  आज पुरुषांच्या कपड्यांचा प्रसिद्ध असलेला ब्रँड नोस्ट्रम मध्ये केले असून या ब्रँडची आज उलाढाल 150 कोटी रुपयांच्या घरात आहे. एक छोटेसे दुकान तर आज नोस्ट्रम ब्रँडच्या माध्यमातून बॉलीवूड सेलिब्रिटींच्या पेहराव पर्यंत पोहोचला आहे.

पाच लाख रुपयांचे  कर्ज घेऊन सुरू केलेल्या त्यांचा या व्यवसायाचा प्रवास खरच इतर व्यवसायिकांना प्रेरणादायी आहे. राज नवानी यांनी बायोलॉजीमध्ये पदवी संपादन केली असून 23 व्या वर्षी  त्यांच्या वडिलांच्या कपड्यांच्या दुकान ज्याच्या नाव जय जवान जय किसान होते त्यामधून त्यांनी प्रेरणा घेतली व या कपड्यांच्या व्यावसायिक दुनियेत प्रवेश केला 1995 मध्ये सॉरी मॅडम नावाने कपड्यांचे छोटेसे दुकान सुरू केले

व अल्पावधीमध्ये हे दुकान दमोह शहरात नावारूपास आले. आज त्यांचा कपड्यांचा नोस्ट्म ब्रँड खूप प्रसिद्ध असून 150 कोटी रुपयांच्या उलाढाली सह मोठ्या प्रमाणावर फॅशन विश्वामध्ये स्वतःचे नाव टिकवून असून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. यामागे नक्कीच राज नवानी यांचे प्रचंड प्रमाणात घेतलेले कष्ट आणि ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नातील सातत्य आणि चिकाटी हे गुण महत्त्वाचे ठरले.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News