State Bank of India : तुम्हीही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना खाते बंद झाल्याचा बनावट संदेश मिळत आहे. याबाबत ग्राहकांना सूचना देण्यात आली असून त्या फेक मेसेजला रिप्लाय देऊ नका. हा मेसेज खोटा आहे आणि त्याला प्रत्युत्तर देणारे या फसवणुकीला बळी पडू शकतात असे बँकेने सांगितले आहे.
SBI ग्राहकांना पाठवलेल्या मेसेजमध्ये असे लिहिले आहे की प्रिय SBI वापरकर्त्यांनो, आज तुमचे YONO खाते ब्लॉक केले जाईल. तुमचा पॅन कार्ड क्रमांक अपडेट करण्यासाठी कृपया या लिंकवर क्लिक करा. या मेसेज पासून सावध राहण्याची सूचना बँकेने केली आहे.
ग्राहकांनी त्यांचे बँकिंग तपशील कोणालाही सांगू नये, तसेच अशा ईमेल/एसएमएसला कधीही प्रतिसाद देऊ नका असा इशाराही बँकेकडून देण्यात आला आहे. तुम्हाला असा कोणताही संदेश मिळाल्यास, ‘[email protected]’ वर त्वरित कळवा.
वैयक्तिक माहिती शेअर करू नका
SBI वेबसाइटनुसार, खाते क्रमांक, पासवर्ड किंवा संवेदनशील माहितीसह कोणतेही वैयक्तिक तपशील संदेशांद्वारे उघड करू नका, कारण त्याचा वापर फसवणुकीसाठी केला जाऊ शकतो.
SBIचा ग्राहकांना इशारा
SBI खातेधारकांना त्यांची माहिती अपडेट करण्याची, खाते सक्रिय करण्याची किंवा फोन नंबरवर कॉल करून किंवा वेबसाइटवर माहिती देऊन त्यांची ओळख सादर करण्याची तातडीची गरज व्यक्त करणारा मजकूर संदेश प्राप्त झाल्यास त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. हे संदेश फिशिंग स्कॅमचा भाग असू शकतात. तुमच्या खात्याची गोपनीय माहिती मिळवण्यासाठी आणि फसवणूक करण्यासाठी हे फसवणूक करणाऱ्यांकडून केले जात आहे. असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.