HDFC Life, डाबर इंडियासह ‘हे’ 3 शेअर्स गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त रिटर्न! टॉप ब्रोकरेज हाऊसकडून मिळाली बाय रेटिंग

Published on -

Stock Market : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी स्टॉक मार्केट विश्लेषक आणि ब्रोकरेज हाऊस सातत्याने गुंतवणुकीसाठी काही शेअर सुचवत असतात. अशा स्थितीत जर तुम्हाला हे तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये नवीन शेअर्स ॲड करायचे असतील तर आजची बातमी खास राहणार आहे.

कारण आज आपण स्टॉक मार्केट विश्लेषकांनी सुचवलेल्या टॉप तीन शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत. आज आपण ज्या शेअरची माहिती पाहणार आहोत त्यात एचडीएफसी लाइफ आणि डाबर इंडिया सारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअरचा सुद्धा समावेश आहे.

टॉप ब्रोकरेज कडून सुचवण्यात आलेल्या या कंपन्या विविध क्षेत्रात कार्यरत असून या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना येत्या काळात मोठ्या नफा मिळणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 

 हे शेअर्स गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल 

एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स : ही इन्शुरन्स कंपनी येत्या काळात गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देणार असा अंदाज आहे. विमा क्षेत्रातील HDFC Life Insurance या दिग्गज कंपनीला पीएल कॅपिटलने बाय रेटिंग दिलेली आहे. यासाठी ब्रोकरेज कडून 900 रुपयांचे टार्गेट प्राईज देण्यात आली आहे. शेअरच्या करंट मार्केट प्राइस बाबत बोलायचं झालं तर सध्या स्थितीला हा स्टॉक 758 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करतोय. अर्थात ब्रोकरेजचा अंदाज खरा ठरला तर या शेअर्स मधून गुंतवणूकदारांना 18 टक्क्यांपर्यंत मोठे रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. ही देशातील एक प्रमुख खाजगी इन्शुरन्स कंपनी आहे. या कंपनीला एचडीएफसी बँकेचे पाठबळ असून ही कंपनी वैयक्तिक आणि गट विमा योजना पेन्शन आणि गुंतवणूक सारखे उत्पादन पुरवत आहे. या कंपनीचे जाळे संपूर्ण देशभर पसरलेले आहे आणि या कंपनीच्या वाढीसाठी सध्या मोठी पोषक स्थिती बनली आहे.

डाबर इंडिया : नुवामा ब्रोकरेजने Dabur India च्या शेअरसाठी बाय रेटिंग दिलेली आहे. अर्थात गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी करावा अशी शिफारस ब्रोकरेज कडून करण्यात आली आहे. या शेअर्स बाबत बोलायचं झालं तर सध्या याची करंट मार्केट प्राइस फक्त 521 रुपये आहे. पण येत्या काळात हा स्टॉक 605 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज आहे. ब्रोकरेजचा अंदाज खरा ठरला तर गुंतवणूकदारांना करंट मार्केट प्राइस पेक्षा सोळा टक्के परतावा मिळणार आहे.

ट्रेंट लिमिटेड : ही कंपनी टाटा समूहाचा एक महत्त्वाचा भाग आहे. दरम्यान मॉर्गन स्टॅनलीने Trent Ltd या टाटा समूहाच्या रिटेल कंपनीसाठी बाय रेटिंग जाहीर केली आहे. सध्या या कंपनीचे स्टॉक 4429 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करत आहेत. पण करंट मार्केट प्राइस पेक्षा हा स्टॉक 23 टक्क्यांनी वाढणार असा अंदाज ब्रोकरेजचा आहे. यासाठी ब्रोकरेज कडून 5456 रुपयांची टार्गेट प्राईस देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News