मस्तपैकी कॉलेज करा आणि कॉलेज सोबत ‘हे’ पार्टटाइम व्यवसाय करा! कमवाल भरपूर पैसा

ज्याप्रमाणे एखादी नोकरी किंवा व्यवसायासाठी पूर्ण वेळ द्यावा लागतो. त्याचप्रमाणे असे बरेच व्यवसाय आहेत की तुम्ही तुमचा दुसरा उद्योग किंवा नोकरी सांभाळून किंवा इतकेच नाही तर तुम्ही तुमचे कॉलेज वगैरे सांभाळून देखील अशा व्यवसायांच्या माध्यमातून तुम्ही उत्तम प्रकारे पैसा मिळवू शकतात.

Ajay Patil
Published:
business idea

Part Time Business Idea:- ज्याप्रमाणे एखादी नोकरी किंवा व्यवसायासाठी पूर्ण वेळ द्यावा लागतो. त्याचप्रमाणे असे बरेच व्यवसाय आहेत की तुम्ही तुमचा दुसरा उद्योग किंवा नोकरी सांभाळून किंवा इतकेच नाही तर तुम्ही तुमचे कॉलेज वगैरे सांभाळून देखील अशा व्यवसायांच्या माध्यमातून तुम्ही उत्तम प्रकारे पैसा मिळवू शकतात.

तर यामध्ये तुम्हाला नेमका कोणता व्यवसाय सुरू करावा याबद्दलची पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे. तुमची मनापासून इच्छा असेल आणि तुम्हाला व्यवसायामध्ये खरोखरच आवड असेल तर तुम्ही असे अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत की ज्या माध्यमातून चांगला पैसा मिळवू शकतात.अशाच काही व्यवसायांची थोडक्यात माहिती आपण या लेखात बघू.

कॉलेज करताना किंवा वीकेंडला करता येतील असे व्यवसाय

1- योगा क्लासेस घेणे- आरोग्य विषयी आजकालचे लोक खूप जागरूक झाले असून हेल्थ आणि वेलनेस ही वेगाने वाढणारी इंडस्ट्री म्हणून नावारूपाला येत आहे. आपण बघतो की अनेक नोकरदार तसेच प्रोफेशनल त्यांना नोकरीमुळे आरोग्यासाठी वेळ देता येत नाही व त्यांना शक्य होत नाही.

अशा व्यक्तींसाठी तुम्ही शनिवारी किंवा रविवारी योगा क्लास घेऊ शकतात. यामध्ये जर तुम्हाला योग करता येत नसेल किंवा शिकवता येत नसेल तर काही संस्थांच्या माध्यमातून शॉर्ट टर्म कालावधीचे योग्य प्रशिक्षक अभ्यासक्रम सध्या उपलब्ध आहेत. या माध्यमातून तुम्हाला योग शिकता येतील आणि तुम्ही प्रशिक्षक देखील व्हाल.

2- साईड बिजनेस सुरु करणे- समजा तुम्ही कॉलेजला जातात किंवा नोकरी करत आहात तर यासोबत तुम्ही एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकतात. यामध्ये तुम्ही एखादे दुकान सुरू करून त्यात गरजेनुसार माणसं कामाला ठेवू शकतात

व तुम्ही नोकरी नंतरच्या किंवा कॉलेज नंतरच्या वेळेत किंवा सुट्टीच्या दिवसात दुकानात लक्ष घालू शकतात. दुकानच नाहीतर याप्रमाणे साईड बिझनेस म्हणून करता येतील असे भरपूर व्यवसाय तुम्हाला सापडू शकतात.

3- दुसऱ्याच्या व्यवसायात भागीदार होणे- बऱ्याच जणांना व्यवसाय सुरू करायचा असतो, परंतु कित्येकांना पैशांची अडचण असते व त्यामुळे व्यवसाय सुरू करता येत नाही. अशा प्रसंगी तुम्ही एखाद्याच्या व्यवसायात गुंतवणूक करून पार्टनर होऊ शकतात. हा व्यवसाय तुमचा नसल्यामुळे तुम्हाला त्याच्या रोजच्या व्यवहारांमध्ये लक्ष देण्याची आवश्यकता नसते.

तुम्ही तुमचा उपलब्ध वेळ किंवा आवडीनुसार त्या व्यवसायात लक्ष घालू शकतात. अशा व्यवसायामध्ये तुमच्या गुंतवलेल्या पैशाचा योग्य वापर होऊन व्यवसाय वाढत आहे की नाही हे तुम्ही पाहू शकता व त्यामधून चांगला पैसा मिळवू शकतात.

4- विमा सल्लागार- IRDA परीक्षा पास होऊन तुम्ही कोणत्याही विमा कंपनीचे विमा एजंट किंवा विमा विक्रेते होऊन जीवन विमा किंवा जनरल विमा विकू शकता. शहरी भागामध्ये बारावी आणि ग्रामीण भागात दहावी उत्तीर्ण कुठल्याही विद्यार्थ्याला ही परीक्षा देता येऊ शकते.

दीड ते दोन हजार रुपये या परीक्षेचा खर्च असतो व ही एवढीच गुंतवणूक करून तुम्ही विमा सल्लागार होऊ शकतात. हा व्यवसाय तुम्ही तुमच्या सुट्टीच्या दिवशी किंवा तुमच्या रिकाम्या वेळेत इतर लोकांना भेटून तुमच्या विम्याबद्दल माहिती देऊ शकतात व विम्याची विक्री करून त्यातून पैसा मिळवू शकतात.

5- टूर ऑपरेटर- शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी तुम्ही अनेक छोट्या छोट्या सहलींचे आयोजन करू शकतात. बऱ्याच लोकांना दररोजच्या धावपळीच्या जीवनशैलीतून काही आरामाचे व आनंदाचे क्षण घालवायचे असतात व हिच संधी यामध्ये तुम्हाला उपलब्ध होते.

तुम्ही तुमच्या कल्पकतेने मस्त नैसर्गिक ठिकाण किंवा काही थीम ठरवून छान सहली आयोजित करू शकतात. एकदा तुमच्या सहलींची सवय जर लोकांना लागली तर तुमचा हा व्यवसाय बारमाही स्वरूपाचा देखील होऊ शकतो.

6- इतरांना तुमचे कौशल्य शिकवणे- प्रत्येकामध्ये कुठले तरी स्किल्स असतात व तुमच्यात देखील काही महत्त्वाचे स्किल्स असतील तर ते तुम्ही इतरांना शिकवू शकतात. लोक असे स्किल शिकायला कायम तयार असतात. यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा एक अभ्यासक्रम तयार करता आला पाहिजे व टप्प्याटप्प्याने शिकवता येणे गरजेचे आहे.

या प्रकारचे तुम्ही प्रत्यक्ष वर्ग घेऊ शकता किंवा गुगल मीट किंवा झूमच्या माध्यमातून लोकांना ऑनलाईन देखील शिकवू शकतात. तुम्ही जे काही शिकवणार आहात त्या क्षेत्रातले तुमचे ज्ञान तसेच तुमची शिकवण्याची पद्धत आणि अभ्यासक्रमांमधील तुमचे कंटेंट या तीन गोष्टी लोकांना जर आवडल्या तर लोक यासाठी पैसे द्यायला तयार होतात व नक्कीच अशा अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात.

तसेच लोकांना शिकवता येईल अशी कौशल्य तुमच्यात नसतील तर तुम्ही इंटरनेटवर सध्या लोक काय काय शिकतात? नवीन काय आहे अशा गोष्टींचा शोध घ्यावा व स्वतः ते शिकावे व त्याचा सराव करावा. स्वतः सराव करून तुम्ही अशा गोष्टी लोकांना शिकवायला सुरुवात करू शकतात व या माध्यमातून देखील तुम्ही चांगला पैसा मिळवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe