Success Story: 5 हजार रुपये उसने घेऊन केली व्यवसायाला सुरुवात आणि आज आहे कोट्यावधींची कंपनी! वाचा यशोगाथा

Ajay Patil
Published:

Success Story:- कुठल्याही गोष्टीची सुरुवात पहिली तर ती अगदी छोट्या प्रमाणामध्ये करावी लागते व कालांतराने त्यामध्ये योग्य नियोजन आणि कष्ट आणि सातत्याच्या जोरावर हळूहळू त्यात वाढ करून त्यामध्ये विस्तार करणे गरजेचे असते. आज आपण व्यवसायांचा विचार केला तर आपल्याला समाजामध्ये असे अनेक व्यावसायिक दिसून येतील की त्यांची सुरुवात अगदी छोट्या प्रमाणामध्ये  केलेली असते

आणि कालांतराने कष्ट आणि नियोजनाच्या जोरावर आज या छोट्याशा रोपट्याचे रूपांतर वटवृक्ष मध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येते. साहजिकच यादरम्यान चा कालावधी हा खूपच कष्टाचा, चढउतारांचा असतो. कारण कुठलीही गोष्ट अगदी सहजपणे व्यक्तीला प्राप्त होत नसते हे तेवढे सत्य आहे.

परंतु आलेल्या परिस्थितीशी दोन हात करत त्यातून मार्ग काढत जो व्यवसायाला पुढे नेतो तो यशस्वी होतो. या मुद्द्याला धरून जर आपण ज्योती लेबोरेटरीज लिमिटेडचे संस्थापक खासदार रामचंद्रन यांचे उदाहरण घेतले तर त्यांनी कष्टाच्या जोरावर अवघ्या पाच हजार रुपये उसने घेऊन सुरू केलेली कंपनीचे मार्केट व्हॅल्युएशन आज 13583 कोटी रुपये आहे.

परंतु या कालावधीचा त्यांचा प्रवास हा देखील तेवढाच प्रेरणादाय असाच आहे. आपल्याला सगळ्यांना उजाला नीळ माहिती आहे. याच नीळचे उत्पादन या ज्योती लॅबोरेटरीजच्या माध्यमातून केली जाते. नेमके खासदार रामचंद्रन यांनी हा प्रवास कसा पार केला किंवा या कंपनीला या पातळी पर्यंत कसे नेले याबद्दलची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.

 खासदार रामचंद्रन यांचा थक्क करणारा प्रवास

खासदार रामचंद्रन यांच्यामध्ये एक गुण असा होता की ते नेहमीच काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी शिकत असत. त्यामुळे आयुष्यामध्ये काहीतरी वेगळे करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये कायमच होता. जेव्हा त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले तेव्हा काही कालावधी करिता त्यांनी लेखापाल म्हणून काम करायला सुरुवात केली.

परंतु त्यांच्या मनामध्ये काहीतरी व्यवसाय करावा असा विचार होता व यातूनच त्यांनी त्यांच्या भावाकडून पाच हजार रुपये उसने घेऊन एक तात्पुरता कारखाना सुरू केला. आज याच कारखान्याचे रूपांतर ज्योती लेबोरेटरीज या मल्टी ब्रांड कंपनीमध्ये झालेले आहे. आज या पाच हजार रुपये भांडवलातून सुरू झालेल्या कंपनीचे जर तुम्ही मार्केट कॅप पाहिले तर ते तब्बल 13000 कोटींच्या पुढे आहे.

 त्यांच्या मुलीच्या नावाने सुरू केली कंपनी

याबाबत प्राप्त रिपोर्टचा विचार केला तर खासदार रामचंद्रन यांची मुलगी ज्योती यांच्या नावावर या कंपनीचे नाव ज्योति लॅबोरेटरीज असे ठेवण्यात आलेले आहे. पांढरा कपड्यांच्या लोकांच्या मागणीला प्रतिसाद देत या कंपनी उजाला सुप्रीम लिक्विड फॅब्रिक व्हाइटनर तयार केले.

हे तयार उत्पादन त्यांनी सहा महिलांच्या गटांद्वारे घरोघरी विकले. त्यानंतर फार कमी कालावधीमध्ये या उजाला सुप्रीमने भारताच्या घराघरांमध्ये लोकप्रियता प्राप्त केली. ज्योती प्रयोगशाळा सुरुवातीला दक्षिण भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढल्या. साधारणपणे 1997 पर्यंत त्यांचे उत्पादन संपूर्ण देशात लोकप्रिय झाले.

आज आपण उजालाचा विचार केला तर राष्ट्रीय स्तरावर लिक्विड फॅब्रिक क्षेत्रामध्ये खूप मोठा वाटा आहे. ज्योती लॅबोरेटरीज या कंपनीची उजाला लिक्विड क्लास व्हाइटनर आणि मॅक्सो मॉस्किटो रिपेलेंट हे दोन महत्त्वाचे उत्पादन हे देशात खूप प्रसिद्ध झालेली आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe