Success Story:- मुलगी ही घराचे वैभव असते असे म्हटले जाते. तसे पाहिले गेले तर ही बाब सत्यच आहे. मागील काही दशकांचा विचार केला तर मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचा जन्म होणे ही बाब बऱ्याच कुटुंबांना हवी तेवढी आनंददायी राहत नव्हती. परंतु आता काही वर्षांपासून परिस्थिती पूर्णपणे बदलली असून जे मुलं करू शकत नाही ते मुली अगदी सहजपणे करून दाखवत आहेत.
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रच नव्हे तर अनेक पुरुषी मक्तेदारी असलेल्या क्षेत्रांमध्ये देखील आता मुली पुढे आहेत. संरक्षण क्षेत्र असो की हवाई वाहतूक, तंत्रज्ञान, विज्ञान म्हणजेच पाहायला गेले तर सगळ्या क्षेत्रामध्ये आता मुली पुढे आहेत. जर आपण काही वर्षांपासूनचा स्पर्धा परीक्षांचा निकाल पाहिला तर मुलींचा आकडा किंवा टक्का वाढताना दिसून येत आहे.

अव्वल क्रमांकावर उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणामध्ये मुलींची सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आपल्याला दिसून येते की आता मुलींनी देखील दाखवून दिली आहे की हम भी किसीसे कम नही. याच मुद्द्याला धरून जर आपण बेंगलोर मधील कीर्ती जांगडा व नीतू यादव या दोन लेकींची यशोगाथा पाहिली तर त्यांनी एका खोलीच्या कार्यालयामधून व्यवसायाला सुरुवात केली व आज त्यांचा व्यवसाय हा कोटींच्या घरात पोहोचला आहे.
दोन लेकींनी सुरू केलेला व्यवसाय कोटींच्या घरात
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बेंगलोर या ठिकाणी एका छोट्याशा खोलीमध्ये नीतू यादव व कीर्ती जांगडा या दोन तरुणींनी एका छोट्याशा खोलीतून व्यवसायाला सुरुवात केली व आज त्यांचा हा व्यवसाय कोटींच्या घरात पोहोचला आहे. साधारणपणे आपल्याला माहित आहे की देशामध्ये पाळीव प्राणी म्हणजेच म्हैस, गाय तसेच बकरी इत्यादींचा खरेदी विक्रीचा व्यवहार हा बाजारपेठेतून प्रामुख्याने होत असतो.
परंतु बदलत्या काळानुसार आता पाळीव प्राण्यांची खरेदी विक्री ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून देखील करणे शक्य झाले आहे व ही अशक्य गोष्ट या दोन मुलींनी शक्य करून दाखवलेली आहे. कीर्ती जांगडा व नीतू यादव यांनी एक ॲनिमल ॲप तयार केले व त्याचा वापर देशातील 80 लाख शेतकरी करत असून एप्लीकेशनच्या माध्यमातून आतापर्यंत साडेआठ लाखांपेक्षा अधिक जनावरांची खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे.
या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून गाई, म्हशी तसेच शेळ्या व इतर पाळीव प्राण्यांची खरेदी विक्री मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही घरी बसून करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे हे ऑनलाइन एप्लीकेशन फ्लिपकार्ट, ॲमेझॉन यासारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म सारखेच आहे.
या दोघी तरुणींना हे ऍनिमल एप्लीकेशन सारखे स्टार्टअप सुरू करण्याची कल्पना सुचली व या दोघींसोबत त्यांचे दोन मित्र अनुराग बिसोय व लिबिन व्ही. बाबू यांनी मिळून हा व्यवसाय सुरू केला. यापैकी नीतू यादव व कीर्ती जांगडा या आयआयटी दिल्लीतून उत्तीर्ण आहेत.
50 कोटी रुपये भांडवल टाकून 500 कोटींचा व्यवसाय उभारला
साधारणपणे ऑगस्ट 2019 मध्ये त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली. हा व्यवसाय सुरू करण्याआधी त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या व एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये त्यांनी याबाबत शेतकऱ्यांचे मत काय आहे हे जाणून घेतले शेतकऱ्यांना देखील या दोघींची कल्पना खूप आवडली. त्यानंतर 50 लाख रुपयांचे भांडवल टाकून त्यांनी ही स्टार्टअप कंपनी सुरू केली आज त्यांच्या या ऑनलाइन प्लॅटफॉर्मला 80 लाख शेतकरी जोडले गेलेले आहेत.
या एप्लीकेशनचा शेतकऱ्यांना कसा होतो फायदा?
या ॲनिमल मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही घरी बसून जनावरांची ऑनलाईन खरेदी विक्री करू शकतात. या माध्यमातून तुम्ही राहत असलेल्या ठिकाणापासून शंभर किलोमीटर परिघातील प्राण्यांची विक्री करणारे व खरेदी करणारे यांची माहिती तुम्हाला या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळते व तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे खरेदी करणारा किंवा विक्री करणाऱ्याशी संपर्क साधून प्राण्यांची खरेदी विक्री करू शकतात.
‘फोर्ब्स‘ने घेतली दोघींच्या कार्याची दखल
या ऍनिमल एप्लीकेशनच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांचा व्यवसाय होत असून या दोघी लेकींनी मिळवलेल्या यशाची चर्चा देशात झाली व तुमच्या या उत्तम कामाची कौतुक व प्रशंसा करत ‘फोर्ब्स’ या मासिकाने तीस वर्षाखालील वयोगटातील सुपर-30 च्या यादीमध्ये कीर्ती जांगडा व नीतू यादव यांचा समावेश केला.













