Success Story: ‘हा’ तरुण बांबू आणि केळी पासून बनवतो विविध उत्पादने! दीडच वर्षात कमावले 20 लाख रुपये

Ajay Patil
Published:
business success story

Success Story:- आजकाल अनेक तरुण विविध प्रकारचे स्टार्टअप सुरू करत असून विविध कल्पनांना व्यावसायिक स्वरूपात उतरवून त्या माध्यमातून चांगला असा नफा मिळवताना दिसून येत आहेत. अशा प्रकारचे स्टार्टअप कृषी क्षेत्राशी संबंधित आहेतच परंतु काही सेवा आणि इतर क्षेत्राशी संबंधित आहेत.

जर आपण कृषी क्षेत्राच्या अनुषंगाने विचार केला तर कृषी प्रक्रिया उद्योग हे खूप महत्त्वाचे असे उद्योग असून कमीत कमी गुंतवणुकीतून देखील या माध्यमातून भरघोस प्रमाणात आर्थिक नफा मिळवता येणे शक्य असल्याने अनेक तरुण आता कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्या स्टार्टअप च्या दिशेने वळताना आपल्याला दिसून येत आहेत.

याच मुद्द्याला धरून जर आपण बिहार राज्यातील एका तरुणाचा विचार केला तर या तरुणाने व त्याच्या मित्रांनी मिळून एक स्टार्टअप सुरू केला व बांबू आणि केळीचे संबंधित विविध उत्पादने या माध्यमातून बनवायला सुरुवात केली आहे व या व्यवसायातून त्यांना दीड वर्षांमध्ये वीस लाखापेक्षा अधिकचे कमाई झाली आहे. या तरुणांची यशोगाथा बघणार आहोत.

 केळी आणि बांबूशी संबंधित स्टार्टअपच्या माध्यमातून लाखोत कमाई

यासंबंधी सविस्तर वृत्त असे की,  बिहार राज्यातील ऋषभ कुमार आणि विश्वजीत कुमार या दोन तरुणांनी केळी आणि बांबू या संबंधित काही उत्पादने बनवून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून या माध्यमातून त्यांनी इतर लोकांना रोजगार देखील मिळवून दिलेला आहे.

जर आपण यामधील ऋषभची शैक्षणिक पात्रता पाहिली तर तो अर्थशास्त्र या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असून विश्वजीत यांनी देखील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन या दोघांनी बांबू आणि केळी पासून बनवलेल्या उत्पादनांचा एक स्टार्टअप सुरू केला आहे. यामध्ये ते बांबू आणि केळीशी संबंधित विविध प्रकारच्या विविध जीवनशैलीशी संबंधित आणि कार्पोरेट भेटवस्तू बनवण्याचे काम करत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

जेव्हा ऋषभ हा शिक्षण घेत होता तेव्हाच काहीतरी वेगळे करण्याची इच्छा त्याच्या मनात होती व त्यामुळे त्यांनी वर्षाला 11 लाख रुपये पॅकेज असलेली नोकरी सोडून स्वतःचा स्टार्टअप सुरू केला आहे व या माध्यमातून पर्यावरण पूरक उत्पादने बनवून इतर लोकांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.

जर आपण ऋषभ व त्याचा मित्र विश्वजीत यांचा विचार केला तर 2022 पासून ते याकरिता प्रयत्न करत होते व सुरतीपासून इको फ्रेंडली उत्पादने बनवावी अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी बांबूपासून टूथब्रश, पाण्याच्या बाटल्या तसे डायरी व पेन्सिल इत्यादी उत्पादने बनवायला सुरुवात केली तर केळी पासून बनवलेल्या अनेक प्रकारची उत्पादन देखील ते आता तयार करत आहेत.

जर आपण गेल्या मे येईपर्यंतचा विचार केला तर या मधून 15 लाखांपेक्षा अधिक किमतीच्या उत्पादनांची विक्री त्यांनी केली आहे व भविष्यात देखील ती अशीच सुरू राहील अशी अपेक्षा त्यांना आहे. यामध्ये ग्रामीण भागातील जे काही लोक आहेत त्यांच्या सहकार्याने ते बांबू आणि केळीशी संबंधित उत्पादने बनवतात.

घरच्यांचा विरोध असताना ऋषभ या व्यवसायात

ऋषभ कुमारला सुरुवातीला त्यांच्या घरच्यांनी विरोध केलेला होता. बांबू आणि केळीशी संबंधित विविध प्रकारचे उत्पादने बनवून किती पैसे कमवता येतील हे ऋषभने घरच्यांना स्पष्टपणे समजून सांगितले होते. परंतु तरी देखील घरच्यांचा विरोध होता. ऋषभने खाजगी नोकरी सोडली तरी हरकत नाही

परंतु आता सरकारी नोकरीच्या माध्यमातून देखील भविष्य सुरक्षित करावी अशी त्याच्या घरच्यांची इच्छा होती. परंतु अगदी सुरुवातीपासूनच काहीतरी वेगळे करण्याची इच्छा ऋषभच्या मनात असल्यामुळे त्यांनी हा स्वतःचा स्टार्टअप सुरू केला  व निश्चितच आज त्या माध्यमातून लाखो रुपये कमवत आहेच परंतु इतर लोकांना देखील रोजगार देण्यासाठी एक महत्वपूर्ण भूमिका त्यांनी पार पाडली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe