Sukanya Samriddhi Yojana : मुलीच्या पालकांना नेहमीच्या आपल्या मुलीच्या भविष्याची चिंता असते, मुलीचे शिक्षण असो किंवा तिचे लग्न पालकांना नेहमीच या गोष्टींची चिंता सतावत असते, पण जर तुम्हाला मुलीच्या लग्नाच्या वेळी एकरकमी 64 लाख रुपये मिळाले तर? अशा स्थितीत तुमच्या सर्व चिंता दूर होतील, यासाठी आतापसूनच पैसे वाचवणे सुरु ठेवले पाहिजे. जर आपण मुलींबद्दल बोललो तर सरकारकडून खूप उत्तम योजना राबवल्या जातात. अशातलीच एक म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. या योजनेत तुम्ही तुमच्या मुलीचे खाते उघडून, गुंतणूक सुरु करू शकता. तुम्ही छोटी गुंतवणूक करून मोठा फंड तयार करू शकता.
तुम्ही तुमच्या मुलीचे वय 10 वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेत तिचे खाते उघडू शकता. जर एखाद्या गुंतवणूकदाराने आपल्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच या योजनेत खाते उघडले तर तो 15 वर्षांसाठी या योजनेत आपले योगदान जमा करू शकतो.
ही एक छोटी बचत योजना आहे. सरकार दर तीन महिन्यांनी या योजनांसाठी व्याजदर निश्चित करते. जुलै ते सप्टेंबर 2023 या तिमाहीसाठी, सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यावेळी तुम्हाला या योजनेवर वार्षिक 8 टक्के दराने व्याज मिळेल. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर मॅच्युरिटी रकमेच्या 5०% रक्कम काढता येते. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर उर्वरित रक्कम काढता येईल.
सुकन्या समृद्धी योजनेत, एका वर्षात 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर सवलतीचा लाभ देखील उपलब्ध आहे. या योजनेत एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. सुकन्या समृद्धी योजना EEE दर्जासह येते. म्हणजेच तीन ठिकाणी कर सवलत मिळते. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवलेल्या रकमेवर कर सवलत उपलब्ध आहे. या योजनेतून मिळणारे व्याजही करमुक्त आहे. याशिवाय या योजनेत मॅच्युरिटी रक्कमही करमुक्त आहे.
जर तुम्ही SSY योजनेत दरमहा 12,500 रुपये जमा केले, तर ही रक्कम एका वर्षात 1.5 लाख रुपये होईल. या रकमेवर कोणताही कर लागणार नाही. जर आपण मॅच्युरिटीवर 7.6% व्याजदराने गेलो, तर तो गुंतवणूकदार आपल्या मुलीसाठी मॅच्युरिटी होईपर्यंत मोठा फंड तयार करेल. जर गुंतवणूकदाराने त्याची मुलगी 21 वर्षांची झाल्यावर संपूर्ण रक्कम काढली, तर मॅच्युरिटी रक्कम 63 लाख 79 हजार 634 रुपये होईल. यामध्ये गुंतवलेली रक्कम 22,50,000 रुपये असेल. तर व्याजाचे उत्पन्न 41,29,634 रुपये असेल. अशा प्रकारे, तुम्ही सुकन्या समृद्धी खात्यात दरमहा 12,500 रुपये जमा केल्यास, तुम्ही 64 लाख रुपयांचा निधी तयार करू शकता.