Tata Nio FD:- मुदत ठेव अर्थात फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडी हा गुंतवणूकदारांमध्ये अतिशय लोकप्रिय असा गुंतवणुकीचा प्रकार असून याला परंपरागत गुंतवणुकीचा प्रकार म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण बऱ्याच वर्षांपासून गुंतवणूकदार विविध बँकांच्या मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात व या मुदत ठेव योजनांनाच एफडी योजना असे देखील म्हटले जाते.
यामध्ये सर्व सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि अनेक स्मॉल फायनान्स बँकांच्या माध्यमातून आकर्षक असे एफडी योजना राबवल्या जातात व गुंतवणूकदार त्यांच्या सोयीनुसार व त्यांना परवडेल असा व्याजदर ज्या ठिकाणाहून मिळेल त्या ठिकाणी गुंतवणूक करत असतात.
या सगळ्या बँकांच्या स्पर्धेमध्ये आता प्रसिद्ध असलेल्या टाटा ग्रुपने देखील पाऊल ठेवले असून टाटाची डिजिटल फिनटेक कंपनी असलेल्या टाटा निओने देखील आतापर्यंत ग्राहकांना अनेक आर्थिक आणि पेमेंट सुविधा पुरवल्या आहेत व आता त्याही पुढे जात टाटा निओ एफडी सेवा देखील ग्राहकांना देणार आहे. म्हणजेच टाटा डिजिटलने आता फिक्स डिपॉझिट सेवा सुरू केली आहे.
टाटाने सुरू केली फिक्स डिपॉझिट योजना
टाटा ग्रुपच्या जगभरात अनेक प्रकारच्या कंपन्या आहेत व यामध्ये त्यांची डिजिटल फिनटेक कंपनी देखील खूप महत्त्वाची आहे. टाटाची डिजिटल फिनटेक कंपनी असलेल्या टाटा निओ ही एक महत्त्वाची कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक प्रकारच्या आर्थिक व पेमेंट सुविधा पुरवल्या जातात व आता त्याही पुढे जात टाटा निओ ग्राहकांना एफडी सेवा देखील पुरवणार आहे.
म्हणजे आता टाटा डिजिटलच्या माध्यमातून फिक्स डिपॉझिट सेवा सुरू करण्यात आली असून टाटा डिजिटलने त्यांच्या सुपर ॲप टाटा निओवर मुदत ठेवी सुविधा सुरू करून किरकोळ गुंतवणूक क्षेत्रामध्ये प्रवेश केल्याची घोषणा केलेली आहे.
याबाबत कंपनीने एक निवेदन जारी केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, बचत बँक खात्याशिवाय ग्राहक 9.1% व्याजदराने मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करू शकतात. टाटा डिजिटलचे चीफ बिझनेस ऑफिसर गौरव हजरत यांनी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
ग्राहकांना करता येईल 1000 रुपयापासून गुंतवणूक
टाटाच्या डिजिटल कंपनी टाटा निओने ग्राहकांसाठी फिक्स डिपॉझिट योजना सुरू केली व या योजनेमध्ये ग्राहकांना 1000 रुपयापासून गुंतवणूक करता येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
सध्या या स्मॉल फायनान्स बँक देतात एफडीवर सर्वाधिक व्याजदर
युनिटी स्मॉल फायनान्स बँक 1001 दिवसांच्या एफडीवर नऊ टक्के, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 888 दिवसांच्या एफडीवर 8.25%, जन स्मॉल फायनान्स बँक एक ते तीन वर्ष कालावधी करिता 8.25%,
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक दोन ते तीन वर्ष कालावधी करिता 8.60%, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक बारा महिने कालावधी करीता 8.25 टक्के, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक दोन ते तीन वर्ष कालावधी करीत 8.50% आणि AU स्मॉल फायनान्स बँक 18 महिने कालावधी करिता आठ टक्के इतका एफडीवर व्याज देत आहे.